लालबागच्या राजाच्या चरणी भक्तांची अजब पत्रं

भाविकांचे तरी काय चुकले म्हणा.. बाप्पा थोडी नं व्हॉट्स अॅप, फेसबूकवर नाही न्.. की तो आपल्याशी आपल्याला हवा तेव्हा रिप्लाय देऊ शकेल...म्हणून बाप्पाला भाविक त्याच्या मनातील खऱ्या खुऱ्या इच्छांची पुर्ती व्हावी म्हणून पत्रचं लिहीले

mumbai

गणेशोत्सव म्हटला की, सगळीकडचे वातावरण गणेशमय होऊन जाते. त्यातही मुंबईतील गणेशोत्सव म्हणजे आनंद, जल्लोष आणि फक्त उत्साह… गणपती बाप्पाचे आगमान होऊन दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देखील देण्यात आला. मात्र सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनाकरिता भाविकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळत आहे. त्यापैकीच एक मुंबईतील नवसाला पावणारा बाप्पा म्हणून लालबागच्या राज्याची ख्याती आहे. या राज्याच्या चरणी लाखो भक्त येऊन नतमस्तक होतात. यावेळी बाप्पाच्या दानपेटीत सोने, चांदी, पैसे दान करतात. मात्र, यंदा बाप्पाच्या दानपेटीत भक्ताच्या इच्छा बाप्पाने पुर्ण कराव्यात म्हणून थेट बाप्पाला भोळ्या भाविकांनी पत्र व्यवहार सुरू केला आहे… भाविकांचे तरी काय चुकले म्हणा.. बाप्पा थोडी नं व्हॉट्स अॅप, फेसबूकवर नाही न्.. की तो आपल्याशी आपल्याला हवा तेव्हा रिप्लाय देऊ शकेल…म्हणून बाप्पाला भाविक त्याच्या मनातील खऱ्या खुऱ्या इच्छांची पुर्ती व्हावी म्हणून पत्रचं लिहीले आहे…

प्रचंड असणाऱ्या गर्दीमुळे २ सेकंदाकरिता दर्शन घेताना पायावर नतमस्तक व्हायचे, की बाप्पाला मनातील इच्छा सांगायची, की त्याचे मनमोहून टाकणारे रूप डोळे भरून बघावे हा देखील प्रश्नच आहे. या बाप्पासमोर लाखो भाविक त्यांच्या लाखो वेगवेगळ्या इच्छा.. या एकट्या बाप्पाने कोणाचे आणि काय ऐकावे.. हा देखील संभ्रमात टाकणाराच प्रश्न आहे. मात्र, काही युनिक भक्तांनी तुफान शक्कल लढवत बाप्पाला निवांत वेळात भले मोठाले पत्र लिहून आपले म्हणने, मागण्या सविस्तर मांडल्या आहेत.

हे पत्र अगदी पत्राच्या फॉर्मटमध्ये असल्याने बाप्पा देखील चक्रावला असणार हे मात्र नक्की… यामध्ये अगदी तारीख, वार आणि नावासकट एका भक्तानी आपला पत्र व्यवहार केला आहे. यामध्ये परिक्षेचा निकाल चांगला लागावा म्हणून चक्क सहा पाणी पत्र लिहून त्याला पुरवणी देखील लावली होती, भक्त तरी काय करणार म्हणा बाप्पा आपल्याला भेटायला वर्षातून एकदाच येतो नं….

यातील एक भन्नाट पत्र

देव बाप्पा, मला बियर बारचं लायसन्स मिळू दे, टॅक्स पावती बनु दे, कामात तरक्की होऊ दे, खूप पैसा, गाड्या मिळू दे, लग्नासाठी सुंदर मुलगी मिळू दे पण ती पैशेवाली पण पाहिजे.. अशा मागणीच एक पत्र बाप्पाच्या चरणी आले आहे.

पोलीसातल्या माणसांचीही बाप्पाकडे तक्रार

नेहमी गर्दीचे रक्षण करणाऱ्या पोलीसातल्या माणसाही बाप्पाकडे तक्रार करावी वाटते…या पत्रात तो लिहीतो माझ्या वरिष्ठांची बदली कर नाहीतर माझी तर माझी तरी कर…अशी मागणी सांगून मोकळा होतो आणि यामुळे कॉन्स्टेबलचे पत्राची दखल देखील बाप्पाला घ्यावी लागते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here