घरमुंबईविरार स्टेशनवर शॉर्टसर्किटमुळं लोकलला भीषण आग

विरार स्टेशनवर शॉर्टसर्किटमुळं लोकलला भीषण आग

Subscribe

लोकल उभी असतानाच ओव्हरहेड वायर तुटून ही आग लागली. अंधेरीनंतर आता विरार स्टेशनवर ही घटना घडल्यामुळं पुन्हा एकदा प्रवाशांचा खोळंबा झाला.

आजचा मंगळवार हा अमंगळ आहे असंच दृष्य आहे. अंधेरीला पूल पडल्यानंतर आता विरारच्या चार क्रमांक फलाटावर लोकल उभी असताना शॉर्टसर्किट होऊन अचानक लोकलला भीषण आग लागल्याची घटना संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली आहे. लोकल उभी असतानाच ओव्हरहेड वायर तुटून ही आग लागली. अंधेरीनंतर आता विरार स्टेशनवर ही घटना घडल्यामुळं पुन्हा एकदा प्रवाशांचा खोळंबा झाला.

नक्की काय झालं?

डहाणू लोकल विरार स्टेशनवर उभी असताना अचानक ओव्हरहेड वायर तुटून शॉर्टसर्किट झाला. त्यामुळं आग लागली. या दरम्यान काही काळासाठी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यावर त्वरीत पावलं उचलण्यात आली. ही परिस्थिती थोड्याच वेळात पूर्ववत करण्यात प्रशासनाला यश मिळालं. तरीही काही काळासाठी प्रवाशांचा खोळंबा होऊन भीतीयुक्त परिस्थिती निर्माण झाली होती. नोकरदार व्यक्तींच्या घरी परतीच्या वेळीच ही घटना घडल्यामुळं पुन्हा एकदा तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं होतं. दिवसभर पाऊस पडत असल्यामुळं शॉर्टसर्किटची घटना घडली असल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे.

- Advertisement -

अमंगळ मंगळवार

आज सकाळपासूनच अमंगळ सुरुवात झाली. अंधेरीला पूल कोसळून दिवसाची सुरुवात झाल्यानंतर आज रेल्वेचा सगळा घोळच झाला. दरम्यान वांद्रे ते चर्चगेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली. दोन्ही बाजूला जाणाऱ्या गाड्या लवकर सुरु होणं शक्य नाही. अजूनही हा ढिगारा पूर्ण उपसला गेला नाही. सतत पडणाऱ्या पावसामुळं ढिगारा पूर्ण उचलण्यात यश आलेलं नाही. बुधवारी सकाळी रेल्वे सुरु होण्याचा अंदाज सध्या वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं सकाळी आता प्रवाशांना कोणत्या समस्येला सामोरं जावं लागणार याचा अजूनही अंदाज नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -