सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल

काही महिन्यापूर्वीच ते कोरोना संसर्गातून बरे झाले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे समोर आले होते. काही महिन्यापूर्वीच ते कोरोना संसर्गातून बरे झाले होते. त्यानंतर आज पुन्हा त्यांना मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीव्र पोटदुखीचा त्रास गेल्या काही दिवसांपासून त्यांना होतो आहे. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ट्वीट करून दिली माहिती

“तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल”, असे ट्वीट मुंडे यांनी केले आहेत.

कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार मंत्रालयात

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त २ नोव्हेंबरला कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर ७ दिवस आराम केल्यानंतर अजित पवार यांनी कामाला सुरुवात केली आहे. अजित पवारांना २६ ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान अजित पवार कोरोनामुक्त झाल्यानंतर अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

कोरोनामुक्त झाल्यानंतर अजित पवार यांनी आज मंत्रालयात हजेरी लावत कामकाजाला सुरुवात केली आहे. कोरोनानंतर अजित पवार पहिल्यांदाच‌ मंत्रालयात दाखल झाले होते. खासदार सुप्रिया सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी फेसबूक लाईव्ह करत ही माहिती दिली आहे. अजित पवार कोरोनामुक्त झाले होते त्यावेळी देखील सुप्रिया सुळे यांनी व्हॉटस अ‌ॅप स्टेटस ठेवत सर्वांचे आभार मानले होते.