घरमुंबईआरक्षणासाठी २७ फेब्रुवारीला धनगर समाज आंदोलनाच्या तयारीत

आरक्षणासाठी २७ फेब्रुवारीला धनगर समाज आंदोलनाच्या तयारीत

Subscribe

धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आश्वासनावरच बोळवण केल्याचं सांगत या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘राज्य सरकारने जर २७ तारखेपर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात लेखी अध्यादेश काढला नाही, तर २७ तारखेला धनगर समाज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरेल’, अशा इशारा गुरुवारी धनगर समाजाकडून देण्यात आला आहे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी धनगर समाजासाठी आरक्षण देण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली. मात्र, यासंदर्भात पुन्हा एकदा आश्वासनच पदरात पडल्याने बैठक निष्फळच ठरल्याची भावना धनगर समाजाकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आरक्षणाच्या मागणीवर धनगर समाज ठाम असून येत्या २७ तारखेपर्यंत लेखी अध्यादेश न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा समाजाकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, ‘नेहमीच आश्वासन मिळत असते. नुसताच आश्वासनांचा पाऊस आहे. आज पुन्हा एकदा आम्हाला आश्वासनच मिळाले. पण आता आम्हाला शिफारस नको आहे. आरक्षणाचा अध्यादेश हवा आहे’, अशी प्रतिक्रिया धनगर समाजाचे नेते प्रकाश शेडगे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -