घरमुंबईडायबिटीक रुग्णांनो पाय सांभाळा!

डायबिटीक रुग्णांनो पाय सांभाळा!

Subscribe

पावसाळ्यात डायबेटिक फूटच्या व्याधीत वाढ होते.

मुंबईत पावसाला हळूहळू का होईना सुरूवात झाली आहे. कुठे तुरळक ठिकाणी तर कुठे मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे, पावसाळा आणि आजार यांचा फारच जवळचा संबंध आहे. कारण, या काळात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस, स्वाइन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू अशा अनेक आजारांची साथ येते. पावसाळ्यात सर्वांनीच स्वतःची काळजी घेणे गरजेचं असून मधुमेही रुग्णांनी स्वतःची विशेष काळजी घेण्याचे आवाहन मुंबईतील अपेक्स हॉस्पिटलकडून करण्यात आलं आहे.

पाय आणि पावलांमध्ये मधुमेहासंदर्भातील संसर्ग होण्याची शक्यता

मधुमेही रुग्णाच्या पायाला दुखापत झाल्यास ती लवकर बरी होत नाही. यासाठी पावसाळ्यात मधुमेहींनी पायाला कोणतीही दुखापत होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये पाय आणि पावलांमध्ये मधुमेहासंदर्भातील संसर्ग होण्याची शक्यता असते. छोट्या जखमा (कापणे, खरचटणे, फोड) न जाणवणे, पायाची सर्वसाधारण झीज (यातून भोवरी आणि पायाला घट्टे पडण्याचा त्रास होऊ शकतो.) आणि पायात उसण भरणे अशा त्रासांचा यात समावेश आहे म्हणूनच पायांच्या दुखापतीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असं ही डॉ. भोयर यांनी सांगितलं.

पावसाळ्यात पाय ओले राहिल्यामुळे अथवा ओलाव्यामुळे पायांच्या तळव्याला इनफेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. ज्याचा परिणाम पुढे गॅंगरिन म्हणजे डायबिटीक फूट होण्यामध्ये होऊ शकते. याशिवाय पावसाळ्यात घाम, ओलावा, बुरशी आणि सुक्ष्मजीवांना पोषक वातावरण असते. ज्याचा मधुमेहींना नक्कीच त्रास होऊ शकतो. त्यामुळे, पावसाळ्यामध्ये डायबेटिक फूटच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते.
– डॉ. श्रीकांत भोयर, डायबेटिक फूट शल्यचिकित्सक, अपेक्स हॉस्पिटल
- Advertisement -

हेही वाचा – पावसाळ्यासोबत आले साथीचे आजार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -