मुंबई सेंट्रल आगारातून डिझेल चोरी

सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरांचा शोध सुरू

Mumbai
ST bus

मुंबई सेंट्रलच्या एसटी महामंडळाच्या आगारातून सोमवारी रात्री ५० लिटरपेक्षा जास्त डिझेल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. डेपोत उभ्या असलेल्या एसटी बसमधून हे डिझेल काढण्यात आले आहे. या संबंधित एसटी महामंडळाने नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस एसटी डेपोत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून चोरांचा शोध घेत आहेत.

प्रचंड तोट्यामुळे रखडपट्टी सुरू असलेल्या एसटी महामंडळाला खासगी वाहतूकदाराकडून एसटी बसगाडीचे डिझेल चोरून चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयातील एसटी आगारातील आहे. दररोज या आगारातून २५ हजारांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. इतकेच नव्हे तर राज्यातून आणि राज्याबाहेरून एकूण ११०० पेक्षा जास्त बसगाड्या मुंबई सेंट्रल या एसटी बसस्थानकात ये-जा करत असतात. मात्र इथेच डिझेल चोरी घटना समोर आल्याने एसटी महामंडळाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थिती होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्य रात्री मुंबई सेंट्रल एसटी आगारात एसटी बसेस पार्किंग केल्या होत्या. या उभ्या असलेल्या एसटी बसेसमधून दोघा अज्ञात व्यक्तीने प्लास्टिकच्या पॉईपाचा मदतीने डिझेल चोरी करण्यात आले. मात्रही चोरी करत असताना याची कल्पनाही मुंबई सेंट्रलवरील सुरक्षा रक्षकांना लागू दिली नाही.

मंगळवारी सकाळी एसटी महामंडळाचे कर्मचारी बसगाड्या आगाराबाहेर काढण्यासाठी आले तेव्हा गाडीच्या टाकीखाली बरेच डिझेल पडल्याचे निदर्शनास आले. तेव्हा याची माहिती लगेच नागपाडा पोलिसांना एसटी महामंडळाकडून देण्यात आली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या मदतीने डिझेल चोराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्यापही चोरट्यांचा पोलिसांना शोध लागलेला नाही. मात्र या एसटी बसेसच्या डिझेल चोरीमध्ये कर्मचार्‍यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र अद्यापही चोरीची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मात्र अंतर्गत तपास सुरू आहे.

खासगी वाहतूकदाराकडून चोरी

नागपाडा पोलिसांनी मुंबई सेंट्रलच्या एसटी आगारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याची तपासणी केली. त्यात दोन अज्ञात व्यक्ती दिसून येत आहेत. त्यांची अद्याप ओळख पटली नाही. मात्र आगारातील सुरक्षा रक्षकांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या अज्ञात व्यक्तींना ओळखत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हे दोघेही खासगी वाहतूकदार असल्याचे बोलले जाते. ते एसटीचे डिझेल चोरी करून आपल्या वाहनात भरत असल्याचा संशय एसटीतील कर्मचार्‍यांनी नाव न छापण्याचा अटीवर व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here