मलबार हिलचे नाव ‘रामनगरी’ होणार?

मुंबईच्या या भागामध्ये रामाचे पाय लागल्यामुळे त्याला रामनगरी असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून याआधी देखील अनेक ठिकाणांची नावे बदलण्यात यावीत अशी मागणी केली गेली आहेत.

Mumbai
malabar hill
मलबार हिल

एल्फिस्टन रोड रेल्वे स्थानकाच्या नावाचे नामकरण प्रभादेवी झाल्यानंतर आता मुंबईतल्या आणखी एका उच्चभ्रू लोकवस्तीच्या नावाचे नामकरण होण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या मलबार हिलचे नामकरण करुन रामनगरी असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. महापालिकेच्या सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे यांनी ही मागणी केली आहे. दिलीप लांडे यांनी ही मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिकेच्या महासभेपुढे केली आहे. मुंबईच्या मलबार हिलचे नाव ब्रिटिश काळापासून आहे. ते नाव आता बदलण्यात यावे आणि रामनगरी असे नाव ठेवण्यात यावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

रामाचे वास्तव होते

असे म्हटले जाते की, मलबार हिल भाग प्राचीन असून सीतामातेच्या शोधात निघालेल्या राम आणि लक्ष्मण यांनी काही काळ याठिकाणी वास्तव्य केले होते. मुंबईच्या या भागामध्ये रामाचे पाय लागल्यामुळे त्याला रामनगरी असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून याआधी देखील अनेक ठिकाणांची नावे बदलण्यात यावीत अशी मागणी केली गेली आहेत. अशाप्रकारच्या नामकरण करण्याच्या मागणीची ही पहिली वेळ नाही. ब्रिटिशकाळामध्ये देण्यात आलेल्या नावाचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

महासभेत मंजूर करण्यात येईल

दिलीप लांडे यांनी मलबार हिलच्या नामकरणाची मागणी प्रस्ताव स्वरुपात महापालिकेच्या सभागृहात मांडली आहे. ही ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात येईल. ठराव महासभेत मंजूर झालयानंतर पालिका आयुक्त अजोय महेता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात येणार आहे.

मुंबईतली नामकरण झालेली ठिकाणं

मुंबापूरीचे बॉम्बे नावाचे १९९५ साली नामकरण करुन मुंबई नाव ठेवण्यात आले.

व्हिक्टोरिया टर्मिनसचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठेवण्यात आले

गोरेगाव आणि जोगेश्वरीच्यामधील स्टेशनचे नाव राम मंदिर ठेवण्यात आले

एल्फिस्टन स्टेशनचे नाव २०१८ मध्ये बदलून प्रभादेवी ठेवण्यात आले

या स्टेशनची नावे बदलण्याची मागणी

बॉम्बेचे राज्यपाल असलेले सर रॉबर्ट ग्रॅण्ट यांच्या नावाने असलेले ग्रॅण्ट रोड स्टेशनचे नाव बदलून ग्रामदेवी करण्यात यावे. करी रोड स्टेशनचे नाव लालबाग रेल्वे स्टेशन करण्यात यावे. सँडहर्स्ट रोडचे नाव डोंगरी करण्यात यावे. हार्बर मार्गावरील कॉटन ग्रीन स्थानकाचे नाव काळाचौकी करण्यात यावे. तर, रे रोडचे नाव घोडपदेव करण्यात यावे ही मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा – 

‘प्रभादेवी’ नाव नक्की कोणामुळे?

आणखी सात स्थानकांची नावं बदलणार

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here