Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई आपत्ती घडल्यास आता मुंबईकर वाचवू शकणार इतरांचा जीव; प्रत्येक प्रभागात आपत्कालीन प्रशिक्षण 

आपत्ती घडल्यास आता मुंबईकर वाचवू शकणार इतरांचा जीव; प्रत्येक प्रभागात आपत्कालीन प्रशिक्षण 

मुंबई महापालिकेने मुंबईकरांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला होता.

Related Story

- Advertisement -

मुंबईत दररोज कुठे ना कुठे घर, इमारत, लिफ्ट दुर्घटना, वाहन अपघात, गॅस गळती, शॉर्ट सर्किट अशा विविध प्रकारच्या दुर्घटना घडतात. बहुतांश वेळा आपत्तीप्रसंगी अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावले जाते. मात्र, अग्निशमन दल पोहण्यापूर्वी प्रशिक्षित स्थानिक लोकांची तात्काळ मदत उपलब्ध व्हावी या उद्देशाने मुंबई महापालिकेने मुंबईकरांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला होता.

या उपक्रमाचा भाग म्हणून सोमवारी (४ जानेवारी) सकाळी ११ वाजता परळ परिसरातील प्रभाग क्रमांक २०४ मध्ये ‘प्रथम प्रतिसादक प्रशिक्षण कार्यक्रम’ हे प्रशिक्षण शिबीर शहर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन व प्रशिक्षण केंद्र, साईबाबा पथ येथे आयोजित करण्‍यात आले आहे. या शिबिराचे आयोजन शिवसेना नगरसेवक अनिल कोकीळ यांच्या पुढाकाराने आणि पालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या विद्यमाने करण्यात आले आहे. याचे उद्घाटन पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रशिक्षण शिबिराला शिवसेना खासदार अरविंद सावंत, स्‍थानिक आमदार अजय चौधरी, महापालिका अतिरिक्‍त आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, प्रभाग समिती अध्‍यक्ष रामदास कांबळे, उपायुक्‍त (आपत्ती व्यवस्थापन) प्रभात रहांगदळे आदी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisement -

या शिबिरात प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्ती त्यांच्या परिसरात आपत्ती घडल्यास अग्निशमन दलाची यंत्रणा घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना मदत करू शकणार आहेत. परिणामी, जखमी, गंभीर व्यक्तींना तात्काळ मदत मिळू शकेल आणि त्यांना वैद्यकीय उपचारही तातडीने मिळण्यास मदत होईल. सध्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी कोरोना नियमांचे पालन करून एका वेळी किमान ५० नागरिकांना ‘आपत्कालीन प्रशिक्षण’ देण्यात येणार आहे.

- Advertisement -