घरमुंबईदोन शाळकरी मुलींचा विनयभंग आणि अत्याचार

दोन शाळकरी मुलींचा विनयभंग आणि अत्याचार

Subscribe

स्कूलव्हॅन चालकाला 10 वर्षांचा कारावास

शाळेत बसमधून जाणार्‍या दोन अल्पवयीन मुलीचा बस चालकाने विनयभंग करून त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायमूर्ती एस. पी. गोंधळेकर यांनी दोषी ठरवीत स्कूलबस चालक आरोपी तुळशीराम मणेरे याला 10 वर्षांचा कारावास आणि 28 हजारांचा दंड अशी शिक्षा शुक्रवारी ठोठावली.

आरोपी तुळशीराम मणेरे हा शाळेच्या मुलामुलींना खासगी बसमधून ने-आण करीत होता. दरम्यान, आरोपी मणेरे याने भिवंडीत शाळेत नेणार्‍या 8 वर्षीय आणि 9 वर्षीय मुलींचा विनयभंग करून त्यांच्यावर काळ्या काचा असलेल्या व्हॅनमध्येच अत्याचार केला. याबाबत पालकांना माहिती कळल्यानंतर व्हॅनचालकावर निझामपुरा पोलीस ठाण्यात बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पॉस्को) आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. हे प्रकरण पॉस्को विशेष न्यायालयाचे आणि ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. गोंधळेकर यांच्या कोर्टात अंतिम सुनावणीसाठी आले होते. या खटल्यात सरकारी वकील उज्वला मोहोळकर यांनी युक्तीवाद केला. साक्षीदार आणि पुरावे न्यायालयात सादर केले.

- Advertisement -

दोन्ही मुलींना आरोपी मणेरे याने धमकावल्याने त्या चिमुरड्यांनी कुणालाही काही सांगितले नाही. मात्र, शनिवारी त्यांच्यासोबत लैंगिक छळ होत असल्याने मुली शनिवारी शाळेत जाण्यास नकार देऊ लागल्या. याबाबत जेव्हा शाळेच्या वर्गशिक्षिकेने विचारल्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. शिक्षेकेने पालकांना बोलावून निझामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील मोहोळकर यांनी केला. न्यायालयासमोरही साक्षी आणि पुरावे तपासून आणि ते ग्राह्य धरीत न्यायमूर्ती एस. पी. गोंधळेकर यांनी आरोपी तुळशीराम मणेरे याला शिक्षा ठोठावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -