गरीब, गरजुंना महापालिका करणार जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

अनेक झोपडपट्टी परिसरातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप आता महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Mumbai
Bmc is helping kids who are living in shelter homes
मुंबई महापालिका

करोनामुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झाल्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबांची मोठी परवड सुरु झाली आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याने या कुटुंबांचे जगणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे अनेक झोपडपट्टी परिसरातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप आता महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या माध्यमातून मुंबई महापालिकेला १ लाख जीवनावश्यक किट उपलब्ध करून दिले जाणार असून त्यानुसार महापालिकेच्या २४ विभागांमधील झोपडपट्टी परिसरांमधील खासगी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून (एनजीओ) या जीवनावश्यक किटचे वाटप केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ज्यामुळे अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांना थोडाफार दिलासा मिळणार आहे.

एनजीओंच्या मदतीनुसार महापालिका घेणार पुढाकार

पुढील १८ दिवसांचा साठा करून ठेवण्यासाठी अनेक कुटुंबे खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. परंतु, हातावर बोट असलेल्या अनेक गरीब आणि गरजु कुटुंबांकडे पैसेही नसल्याने त्यांना पुढील दिवसांचे रेशनही भरता येत नाही. त्यामुळे गरीब कुटुंबाचा विचार करता स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या मुंबई महापालिकेने खासगी स्वयंसेवी संस्थांना आवाहन करून जिवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्तांच्या आवाहनानुसार अनेक खासगी संस्थांनी पुढाकार दर्शवला आहे. यामध्ये ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेने महापालिकेला जीवनावश्यक वस्तूंचे १ लाख किट उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे.

त्यामुळे १ लाख किटच्या वितरणासाठी महापालिकेच्या २४ विभागांच्या सहायक आयुक्तांच्या माध्यमातून यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार काही सहायक आयुक्तांनी झोपडपट्टी परिसरातील गरीब आणि गरजू लोकांची यादी स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार धारावी झोपडपट्टी परिसरातील २५० कुटुंबांना अशाप्रकारच्या जीवनावश्यक किटचा वापर करण्याचा विचार असल्याचे सुत्रांकडून समजते.


हेही वाचा – शेल्टरहोम्समधील मुलांच्या मदतीसाठी धावली महापालिका


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here