गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे वाटप

Mumbai

कल्याण येथील समन्वय प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने मुरबाड तालुक्यातील बारवी धरण बदलापूर रस्त्यालगत असलेल्या कोळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 44 आदिवासी गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वस्तूंचे वाटप करण्यात आले. मुरबाड तालुक्यातील कोळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वस्तूंचे नुकतेच वाटप केले गेले. यावेळी समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा कल्याण न्यायालयाचे जेष्ठ वकील जनार्दन टावरे ठाणे न्यायालयाचे सरकारी वकील विजय मुंडे , वकील सुभाष संभारे, वरिष्ठ पत्रकार अविनाश उबाळे, पत्रकार संतोष होळकर, शहापूरचे बहुजन समाज पार्टीचे नेते के .के . संगारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगल निरगुडा, वकील प्रवीण मालुसरे, आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, कोलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत डोहाळे यांनी आभार मानले, यावेळी वकील सुनील उबाळे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच शाळेचे सहशिक्षक मनोहर भोईर, स्थानिक माजी सरपंच नागेश बांगरा, कातकरी समाजाचे नेते लक्ष्मण भोसले, वकील रवींद्र साळवे, चार्टअड अकाउंटंट आशिष चौधरी कल्याणचे उद्योजक गुरुनाथ भोईर, कुणाल शिंदे, संतोष खेताडे, किरण सावंत, सचिन सावंत, अप्पा भोसले, मंगेश टेबे , सुहास मोहळ, आदी समन्वय प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here