कोरोनाच्या सावटातही मुंबईकरांची दिवाळीची खरेदी

सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद असल्यामुळे शहरातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परिणामी नागरिकांना बेस्ट बसने कार्यालयात पोहचण्यासाठी अर्धा तास लागत होता तिथे दोन ते अडीच  तास लागत असल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत.

traffic jam at goregaon

कोरोनाच्या संकटामुळे सण व उत्सवांवर प्रशासनाने निर्बंध आणले आहेत.तरीही नागरिकांचा सण साजरा करण्याचा उत्साह मात्र काही कमी झालेला नाही. धनत्रयोदशीच्या निमित्ताने मुंबईकर खरेदीसाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले होते. मात्र सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा बंद असल्यामुळे शहरातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परिणामी नागरिकांना बेस्ट बसने कार्यालयात पोहचण्यासाठी अर्धा तास लागत होता तिथे दोन ते अडीच  तास लागत असल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले आहेत.

दिवाळीच्या खरेदीसाठी मुंबईतील सर्व परिसरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली. फटाके, कंदील, रंगीबिरंगी दिवे, मिठाई, रांगोळी व पणत्या, फुल व हार, नवीन कपडे, गाड्या व इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा सर्व वस्तूंच्या खरेदीसाठी मुंबईकर घराबाहेर पडला आहे. मात्र लोकल बंद असल्याने  रस्त्यांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे ज्यादा ठिकाणी बाजारपेठा आहेत त्या परिसरात दिवसभर वाहतूक कोंडी होती. माहिम, दादर टीटी, दादर प्लाझा, सेना भवन चौक, कबुतरखाना, टिळक ब्रिज, किंग्ज सर्कल, सायन सर्कल, कुर्ला सिग्नल, सुमन नगर, अमरमहल, रमाबाई नगर, घाटकोपर डेपो, चेंबूर ते देवनार, मानखुर्द, वाशी टोलनाका, गांधी नगर ते एल अ‍ॅण्ड टी कंपनी, सीप्झ, माहीम या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब वाहनांच्या राग लागल्या होत्या. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक  पोलिसांना दमछाक झाली आहेत.

वाहतूक कोंडीमुळे अनेकांना लेटमार्क

दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांमुळे रस्त्यांवरची वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने नागरिकांना  कार्यलयात पोहचण्यासाठी लेटमार्क लागला आहेत. पूर्वी कार्यालयात वाहनाने पोहचण्यासाठी अर्धा तास लागत होता. तिथे शुक्रवारी दोन ते अडीच तास लागल्यामुळे मुंबईकर त्रस्त झाले होते. तसेच बेस्ट आणि एसटीच्या बसेस वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने अनेक प्रवासी बसमधून उतरून पायी जात कार्यलय गाठले आहे. आगोदरच  लॉकडाऊनमुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना दुसरीकडे आता वाहतूक कोंडीमुळे आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.