Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई दिवाळी फराळाच्या झटपट रेसिपी

दिवाळी फराळाच्या झटपट रेसिपी

बऱ्याच वेळा हे पदार्थ बनवताना वेळही कमी पडतो. तर कधी कधी पदार्थांचं प्रमाण चुकलं की पदार्थ बिघडतो. म्हणून दिवाळी फराळ्याच्या स्पेशल रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत.

Related Story

- Advertisement -

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट. दिवाळी म्हटलं कि १५ दिवस आधीच फराळाची सुरूवात होते. प्रत्येक घरात फराळ तयार करण्याची लगबग चालू असते. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात दिवाळीच्या पदार्थाची यादीच तयार असते. ती यादी संपता संपत नाही. बऱ्याच वेळा हे पदार्थ बनवताना वेळही कमी पडतो. तर कधी कधी पदार्थांचं प्रमाण चुकलं की पदार्थ बिघडतो. म्हणून दिवाळी फराळ्याच्या स्पेशल रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. यावर्षीही दिवाळीचा फराळ घरीच करा. चला तर पाहूया दिवाळीच्या फराळासाठी सोप्या रेसिपी आणि काही खास टिप्स.

चकली

- Advertisement -

दिवाळीच्या फराळात बाकी काही नसले तरी चालेल पण चकली असलीच पाहिजे. लहान मुलांना अतिशय आवडणारा पदार्थ म्हणजे चकली. भाजणीच्या चकल्या आणि तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवल्या जातात.
साहित्य 
१ कप चकली भाजणी,पाणी, हिंग, पांढरे तिळ, ओवा, लाल तिखट, तेल, मिठ,चकलीचा साचा

कृती
गरम पाण्यात हिंग, लाल तिखट, ओवा, तेल,पांढरे तिळ आणि मीठ घालून घ्या. पाणी उकळल्या नंतर गॅस बंद करा. नंतर त्यात चकली भाजणी घाला. ते मिश्रण ८-९ मिनिटे झाकून ठेवा. मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर कोमट पाणी टाकून पिठ मळून घ्या. चकलीचा साचा घ्या. त्या साच्याला आतून तेल लावा. त्या साच्यात मळलेल्या पिठाचा गोळा भरा आणि हव्या त्या आकाराच्या चकल्या तयार करा. चकल्या तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या.

चिवडा

- Advertisement -


दिवाळीत वेगवेगळ्या पद्धतीचा चिवडा तयार केला जातो. पोह्याचा चिवडा. कुरमुऱ्यांचा चिवडा, मक्याचा चिवडा बनवला जातो. यात पोह्यांचा चिवडा सर्व घरांमध्ये तयार केला जातो.
साहित्य 
पातळ पोहे, भाजलेली चणाडाळ, शेंगदाणे, सुक्या खोबऱ्याचे काप,हिरव्या मिरच्या , तेल , मोहरी, हिंग,हळद,मीठ, साखर,काजू.
कृती
पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
त्यानंतर कढईत तेल घ्या. त्यात शेंगदाणे, डाळ, काजू, सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घ्या.
फोडणीसाठी तेल घ्या. तेलात मोहरी, कडीपत्ता, मिरच्या, हिंग, शेंगदाणे हे सर्व साहित्य घालून व्यवस्थित ठवळून घ्या. त्यात भाजलेले पोहे, डाळ, काजू, सुक्या खोबऱ्याचे काप घालून पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्या. थोडा वेळ मंद आचेवर ठेवा. खमंग कुरकुरीत पोह्यांचा चिवडा तयार.

शंकरपाळी


दिवाळीतला ठरलेला पदार्थ म्हणजे शंकरपाळी. खुसखुशीत मैद्याच्या गोड शंकरपाळी सर्वांचाच आवडता पदार्थ आहे.
शंकरपाळ्या सर्वांचाच जवळचा आणि आवडीचा पदार्थ आहे.
साहित्य
१ किलो मैदा ,दिड किलो साखर, अर्धा किलो तूप , अर्धा लिटर दूध
कृती
कढईत तूप गरम करा. त्यात दूध ओता आणि साखर घालून विरघळून घ्या. त्यात मैदा घालून छान पिठ मळून घ्या. पिठाची हलक्या हाताने मोठी पोळी लाटून घ्या. सुरी किंवा चरकीने शंकरपाळी तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या. शंकरपाळी तेलात मंद आचेवर तांबूस रंगावर तळा. खुसखुशीत शंकरपाळ्या तयार.

बेसन लाडू


दिवाळीच्या फराळात बेसनाच्या लाडूला एक वेगळ महत्त्व आहे. बेसनाचे लाडू तयार करायला खूप सोप्पे असतात. त्यामुळे ते बनवायला फार वेळ लागत नाही.
साहित्य
बेसन, तूप, पिठी साखर, बेदाणे,वेलची पूड, दूध
कृती
बेसन तुपावर मंद आचेवर छान खमंग भाजून घ्या. पीठ भाजून झाल्यावर त्यात थोडे दूध घालून बाजूला ठेवा. त्यानंतर सारण थोडे थंड होऊ द्या. नंतर त्यात पिठी साखर, वेलची पूड, घालून हलकेसे भाजून घ्या. नंतर मिश्रणाचे छान लाडू वळून घ्या. त्यावर एक बेदाणा लावून थंड करायला ठेवा. बेसनाचे खमंग लाडू तयार.

करंज्या

दिवाळीच्या फराळामधला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंज्या. ओल्या नारळाच्या करंज्या, सुक्या खोबऱ्याच्या करंज्या बनवल्या जातात.
साहित्य
मैदा,रवा,तूप, मीठ, किसलेलं खोबरं,खसखस , काजू, बदाम,वेलची पूड,चारोळ्या

कृती 
मैदा बारिक चाळून घ्या त्यात मोहन घाला. पिठात दूध मिक्स करा आणि पिठ छान मळून घ्या. करंजीच्या आतील सारण तयार करण्यासाठी किसलेलं सुक खोबर,काजू, बदाम,चारोळ्या हलक्याश्या भाजून घ्या.त्यात आवडीप्रमाणे पिठी साखर घाला आवडीनुसार वेलची पुड घाला. मैद्याच्या पिठाचे छोटे छोटो गोळे बनवा. ते पातळ लाटून त्याच्या लाट्या तयार करून घ्या. त्यात मध्यभागी तयार केलेलं सारण भरा. करंजीच्या एका बाजूला पाणी किंवा दूध लावा त्या बाजूला दुसरी बाजू चिकटवा. दोन्ही बाजू व्यवस्थित चिकटवून घ्या. त्यानंतर सुरी किंवा चरकीने जास्तीच्या कडा कापून घ्या. करंज्या तेलात किंवा तुपात मंद आचेवर सोनेरी रंगावर छान तळून घ्या.


हेही वाचा – Diwali 2020: ‘या’ दिवशी साजरी होणार दिपावली; जाणून घ्या, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त

- Advertisement -