घरमुंबईअभ्यासक्रम ५० टक्के करा; अन्यथा विद्यार्थी होतील नापास

अभ्यासक्रम ५० टक्के करा; अन्यथा विद्यार्थी होतील नापास

Subscribe

कमी काळावधीमध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे आकलन होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आणखी २५ टक्के कपात करण्यात यावी,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने दहावी, बारावीचा अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली आहे. परंतु जानेवारी सुरू झाला तरी नियमित वर्ग सुरू न झाले नाही. तसेच कमी काळावधीमध्ये शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे आकलन होण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी नापास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात आणखी २५ टक्के कपात करण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.

राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने २३ डिसेंबरपासून नववी ते बारावीचे नियमित वर्ग सुरू केले. मात्र राज्यातील २२ हजार २०४ शाळांपैकी १९ हजार ५२४ शाळा सुरू झाल्या आहेत. यातही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण हे अवघे २७.८ टक्के इतके आहे. त्यामुळे अद्यापही अनेक विद्यार्थी नियमितपणे शाळेत जात नसल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक यासारख्या महानगरातील विद्यार्थ्यांना त्यांचे पालक शाळेत पाठवण्यास तयार नाहीत. जानेवारी महिना सुरू झाला तरी अनेक शाळांमधील वर्ग अद्याप नियमित सुरू झालेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यामध्ये होणार असल्याची शक्यता काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी वर्तवली होती. त्यामुळे तीन महिन्यांमध्ये ७५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे व त्याची उजळणी घेणे शक्य नाही. तसेच कमी वेळात शिकवलेल्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यांना नीट आकलन होणे अशक्य आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होऊन ते परीक्षेत नापास होण्याची शक्यता अधिक आहे. अभ्यासक्रम पूर्ण शिकवून न झाल्याने नापास होण्याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना सतावत आहे. परिणामी विद्यार्थी मानसिक तणावाखाली येण्याची शक्यता लक्षात घेऊन अभ्यासक्रम आणखी २५ टक्के कमी करून ५० टक्के करण्यात यावा, अशी मागणी मुंबई माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

- Advertisement -

५० ते ६० टक्के विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात अडचणी

राज्य शिक्षण मंडळाने २०२१ मध्ये घेण्यात येणार्‍या शालांत परीक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोरोनामुळे अनेक ठिकाणी शाळा नियमितपणे सुरू झाल्या नाहीत. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन अर्ज भरलेले नाहीत. काही विद्यार्थी हे परगावी असल्याने त्यांना अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे तब्बल ५० ते ६० टक्के विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरता आले नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -