घरमुंबईरेल्वे रूळ ओलांडू नका, पादचारी पूलाचा वापर करा!

रेल्वे रूळ ओलांडू नका, पादचारी पूलाचा वापर करा!

Subscribe

दिवा रेल्वे स्थानकात लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ यांनी प्रवाशांना रेल्वे रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले आहे.

दिवा रेल्वे स्थानकात रेल्वे पादचारी पूल असतानाही प्रवासी बिनधास्तपणे रेल्वे रूळ ओलांडण्यात येतात. गेल्या महिनाभरात ७ जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ यांनी ‘जीवन अमूल्य आहे.. रेल्वे रूळ ओलांडू नका, पादचारी पुलाचा वापर करा,’ असे आवाहन करीत पोलिसांनी प्रवाशांना गुलाबपुष्प दिले.

हेही वाचा – कल्याणात भामट्याचा प्रताप! थेट भारत सरकारच्या राजपत्राचीच नकल!

जीवनाचे महत्व सांगणारी मोहीम

दिवा स्थानकातील रेल्वे फाटकाजवळ रेल्वे क्रॉसिंग करताना प्रवाशांना जीव गमवावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघातात वाढ झाली आहे. रेल्वे पादचारी पूल असतानाही प्रवासी सर्रासपणे रेल्वे रूळ ओलांडत असतात. त्यामुळे रेल्वे फाटक बंद झाल्याशिवाय इथल्या अपघातांवर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे रेल्वे उड्डाणपूल मंजूर झाला असून त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र अजूनही कामास सुरूवात झालेली नाही. मात्र रेल्वे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागत असतानाही प्रवाशांकडून कोणताच धडा घेतला जात नाही. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानक येथे रेल्वे प्रशासनाकडून ‘जीवन अमूल्य आहे, रेल्वे फाटकातून प्रवास करू नका, पादचारी पूलाचा वापरा करा’ अशी मोहीम हाती घेतली होती. शालेय विद्यार्थी आणि रेल्वे अधिकारी यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन पादचारी पूल वापरण्याचा संदेश दिला. त्यामुळे रेल्वे पोलिसांच्या आवाहनाला प्रवासी किती प्रतिसाद येतात हेच पाहावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -