घरमुंबईमहाआघडीच्या संयुक्त जाहिरातीत कदम-तावडेंवर लक्ष्य

महाआघडीच्या संयुक्त जाहिरातीत कदम-तावडेंवर लक्ष्य

Subscribe

शिवसेना-भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने येत्या निवडणुकीसाठी ‘लाज कशी वाटत नाही’ या टॅगलाईन अंतर्गत मंगळवारी नव्या जाहिरातीची घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर ही जाहिरात राज्यात सर्वत्र झळकणार असून, या जाहिरातीच्या निमित्ताने सरकारच्या अनेक घोषणांचा समाचार घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात वादग्रस्त विधान करणारे भाजप आमदार राम कदम आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारकडून गेल्या पाच वर्षांत करण्यात आलेल्या घोषणांची सत्यता जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. सत्ताधारी जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता मते मागायला येतील, तेव्हा ‘सरकारला लाज कशी वाटत नाही’ या टॅगलाईनच्या माध्यमातून जनतेच्या मनातील प्रश्न विचारणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

या व्हिडीओत शेतकरी सन्मान योजना, सरकारकडून सुरू असलेली जाहिरातबाजी, बेरोजगारसारख्या अनेक मुद्यांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पण त्याचबरोबर यावेळी राम कदम यांनी केलेल्या मुली पळविण्यासंंदर्भातील वक्तव्यावरूनही एक व्हिडिओ बनविण्यात आला आहे. तसेच ‘नोकर्‍या मागणार्‍यांना पकोडे तळायला सांगताना लाज कशी वाटत नाही?’, ‘शाळा बंद करून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्‍या सरकारला पुन्हा मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही.’, ‘पंधरा लाखांचे आश्वासन देऊन फसवणूक करणार्‍यांना मते मागायला येताना लाज कशी वाटत नाही?’, अशी वाक्ये या जाहिरातीत उपस्थित करण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -