घरमुंबई'महिला दिनाचा सन्मान नको वस्तू खरेदी करून रोजगार द्या'

‘महिला दिनाचा सन्मान नको वस्तू खरेदी करून रोजगार द्या’

Subscribe

वनवासी महिलांचे कळकळीचे आवाहन

जागतिक महिला दिनी महिलांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून त्यांना एक दिवसांचा रोजगार मिळवून द्यावा, हाच आमचा सन्मान आहे. असे कळकळीचे आवाहन वसईच्या दुर्गम ग्रामीण पट्ट्यातील वनवासी महिलांनी केले आहे.मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत भालीवली गावात विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर आहे. ग्रामीण भागातील उपेक्षीत विद्यार्थी, महिला आणि शेतकर्‍यांसाठी कार्यरत असलेल्या या सेंटरने अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये दाखल होण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच अनेक वनवासी महिलांना बांबु प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला आहे. विवेकच्या राष्ट्र सेवा समिती ग्राम विकास केंद्राने वनवासी महिला, मुलींना केसांच्या क्लीप, ट्रे, मोबाईल स्टॅण्ड, की स्टॅण्ड, गिफ्ट बॉक्स, आराम खुर्ची, फु्रट ट्रे अशा वस्तु वनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.

या वस्तु केंद्रात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या विक्रीतून होणारा नफा वनवासी महिलांना देण्यात येतो. त्यामुळे या महिलांच्या घराची चूल पेटत आहे. 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. या दिवशी सर्वत्र महिलांचा जाहीर सन्मान करण्यात येतो. त्यासाठी त्यांना भेटवस्तुही देण्यात येतात. या वस्तु आमच्या केंद्रातून खरेदी करा. त्यामुळे आमची एक दिवसाची चूल पेटेल हाच आमचा सन्मान असेल. असे आवाहन या महिलांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -