घरमुंबईसंसर्ग रोखत डॉक्टरांनी वाचवले प्राण

संसर्ग रोखत डॉक्टरांनी वाचवले प्राण

Subscribe

अनेकवेळा अपघातांमध्ये हाताला अथवा पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचा जंतूसंसर्ग शरीरात पसरण्याची शक्यता असते. संसर्ग झाल्यामुळे हात - पाय कापल्याचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. मात्र हा संसर्ग रोखत एका रुग्णाचे प्राण वाचवण्यात वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे.

अपघातात उजव्या पायावरुन सिमेंट मिक्सर गेलेल्या एका ३८ वर्षीय व्यक्तीचा जीव आणि पाय दोन्ही वाचवण्यात मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलला यश आलं आहे. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर या व्यक्तीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून ही व्यक्ती आता स्वत: च्या पायावर उभी राहून चालू देखील शकते.

नेमके काय घडले?

कोलकात्याहून मुंबईत कामासाठी आलेल्या ३८ वर्षीय रणजीत शील हे मीरा रोडच्या एका इमारतीच्या साईटवर काम करत होते. १ नोव्हेंबर २०१८ या दिवशी त्यांच्या उजव्या पायावरून सिमेंटचा मिक्सर गेला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना मीरा रोडच्या स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यांच्यावर तात्काळ उपचार करुन फ्रॅक्चर फिक्सेशन आणि दुखापत रक्तवाहिन्यांवर उपचार करुन शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. पण, यशस्वी न झालेल्या शस्त्रक्रियांमुळे त्यांच्या किडनी आणि यकृतामध्ये संसर्ग झाला होता. त्यातून त्यांच्या दोन्ही किडन्या देखील फेल झाल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. हा संसर्ग पूर्ण शरीरात पसरू नये यासाठी त्यांचा पाय कापावा लागेल अशी भीती वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वाटत होती. शिवाय, दोन्ही किडन्यांचा काम देखील थांबलं होतं. त्यामुळे किडन्यांचं काम पूर्ववत व्हावं, यासाठी आधी रणजीत यांना डायलिसीसवर ठेवण्यात आलं. त्यानंतर प्रकृतीत झालेल्या सुधारणेनंतर त्यांच्या पायावर ५ वेळा शस्त्रक्रिया करुन त्यांचा पाय कापण्यापासून वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

- Advertisement -

असा वाचवला पाय?

रणजीतला जेव्हा वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले त्यावेळी त्यांची स्थिती फारच नाजूक होती. त्यांच्या पायाच्या जखमेमुळे त्यांची किडनी आणि यकृताला जंतूसंसर्ग होऊन ते फेल होण्याच्या मार्गावर होते. संसर्ग आणखी पसरु नये यासाठी पाय कापावा का? असा प्रश्न होता. कारण त्यांचा जर जीव वाचवायचा असेल तर पाय कापून तेथून होणारा जंतूसंसर्ग थांबवणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांच्या पायावर शस्रक्रिया करण्यात आल्या. संपूर्ण पाय साफ करुन तिथला संसर्ग कमी करण्यात आला. ही प्रक्रिया किमान ३ वेळा केली. पायाच्या मांसपेशी आणि रक्तवाहिन्यांचं काम पूर्ववत होण्यासाठी त्यांच्या कंबरेच्या भागातील एक हाड काढण्यात आलं आणि त्या जागेवर ते फिक्स करण्यात आलं. त्यांच्या पायावर किमान ५ इंच एवढा गॅप तयार झाला होता. तो त्या हाडामुळे भरुन काढण्यात यश आलं. या शस्त्रक्रियेला बोन क्राफ्ट असं म्हणतात.  – डॉ. निखिल अग्रवाल, वोक्हार्ट हॉस्पिटलचे अस्थीव्यंग शल्यविशारद

या शस्त्रक्रियेनंतर रणजित १० दिवसांतच वॉकरच्या साहाय्याने चालू लागले आहेत. पाय वाचवण्यासोबतच जंतूसंसर्गामुळे इतर अवयव वाचवणे हे वैद्यकीय क्षेत्रामध्ये फारच दुर्मिळ आणि कठीण मानले जाते. रणजितला १५ जानेवारीला डिस्चार्ज मिळाला असून आता ते वॉकरच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन महिन्यात ते व्यवस्थित चालायला लागतील असा विश्वास डॉ निखिल अग्रवाल यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

वाचा – पित्ताशयामध्ये १ फूट २ इंचाची गाठ! वोक्हार्टमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया


 

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -