घरमुंबईकाँग्रेसला राम मंदिर हवे आहे का?

काँग्रेसला राम मंदिर हवे आहे का?

Subscribe

पियुष गोयल यांचे काँग्रेसला आव्हान

आमच्यावर टिका करणार्‍या काँग्रेसला अयोध्येत राम मंदिर व्हावे असे वाटत नाही, जर त्यांना राममंदिर व्हावे असे वाटत असेल तर काँग्रेसचे नेते कायदेशीर अडसर का आणत आहेत, काँग्रेसला राम मंदिर हवे आहे का, असा सवाल करत आमचे सरकार राम मंदिर बांधणारच, असा विश्वास रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

आमच्या सरकारने पाकिस्तानला धडा शिकवला, आता ५ वर्षे विरुद्ध 65 वर्षे असा सामना आहे. एका इमानदार आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत बनवणार्‍या सरकारने पाच वर्षे पूर्ण केली आहेत. तसेच पाच वर्षांत आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या कामाचा रिपोर्ट दिला असून, आता आम्ही फायनल परीक्षेला उतरलो आहोत. त्यासाठी शिवसेना-भाजप युनीते 48 जागांवर विजयी मिळवण्याचा निश्चय केला असल्याचेही गोयल म्हणाले.

- Advertisement -

काँग्रेस-पाकिस्तानमध्ये मिलीभगत
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींचे सरकार यावे, अशी इच्छा व्यक्त केली याबद्दल त्यांना पत्रकारांनी विचारले असता इम्रान खान यांनी भाजपला पाठिंबा दिला नसून ही काँग्रेस-पाकिस्तानची खेळी आहे. संपूर्ण जगाला माहीत आहे की, पाकिस्तानला मोदींपासून धोका आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी जवानांच्या पराक्रमावर, आमच्या विकासकामांवर प्रश्न उपस्थित केले आहे. पण त्याच काँग्रेसने मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानला उत्तर दिले नाही. मात्र आम्ही पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवादी मारले, त्यामुळे पाकिस्तान आज मोदींना घाबरत असल्याचे देखील गोयल म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -