घरमुंबईसाहेब सत्कार नको... कामही द्या..

साहेब सत्कार नको… कामही द्या..

Subscribe

२६/११ तील हिरोची कामासाठी वणवण

२६/११च्या सीएसएमटी स्थानकावर झालेल्या हल्ल्यातील जखमींना मदत करणार्‍या आणि रेल्वे अधिकार्‍यांना वाचणारा मोहम्मद तौफिक शेख (छोटू ) यांची मोलाची भूमिका राहली. त्याच्या सतर्कतेमुळे रेल्वेने ५ हजार रुपयाचे बक्षीस देऊन त्याच्या गौरव सुद्धा केला आहे. मात्र आज मोहम्मदची आर्थिक परिस्थिती नाजूक आहेत. सीएसएमटी स्थानकाजवळ असलेल्या त्याच्या चहाच्या टपरी असून पालिकेकडून त्याच्यावर कारवाई करण्यात येत असते. त्यामुळे घराची आर्थिक घडी सांभळण्यासाठी हा छोटू सध्या नोकरीसाठी वणवण फिरत आहे. इतकेच नव्हे तर २६/११ च्या निमित्ताने त्याच्याकडे सत्कारासाठी येणार्‍या अनेकांकडे तो नोकरीसाठी दयावया करतोय. रेल्वेने देखील त्याला नोकरीचे दिलेले आश्वासन आता हवेत विरल्याने त्याच्यासमोर मोठा प्रश्नचिन्ह उभा ठोकला आहे.

सीएसएमटी स्थानकाजवळ २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पांप लोकांचा बळी गेला. अल्पावधीतच एकच हाहाकार उडाला जखमींची धावपळ सुरु होती. अशावेळी सर्वत्र घबराट पसलेली असताना आपला जीव धोक्यात घालून मोहम्मद (छोटू) तौफिक शेख पुढे आला. मोहम्मद सीएसएम जवळ अनेक वर्षांपासून चहाची टपरी चालवित असून वडाळ येथील प्रतीक्षा नगर परिसरात एका १० बायच्या १२च्या घरात राहतो. बायको, पाच मुली आणि बहिण अशा एकूण आठ लोकांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. २६/११ च्या हल्याचा दिवशी तो नेहमीप्रमाणे रात्री चहाचे पैसे गोळा केल्यानंतर तो रेल्वे स्थानकावर गेला होता, त्याचवेळी फटाके फुटल्यासारखा आवाज झाला. आवाज सुरूच राहिल्याने त्याला शंका आली. दहशतवादी बंदुकींमधून अंदाधुंद गोळीबार करीत असल्याचे त्याच्या लक्षात आल्यानंतर मोहंमद जिवाच्या आकांताने ओरडत होता, एवढ्यात तो रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीच्या खोलीत घुसला, ड्युटीवर असलेल्या रेल्वेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनाही तो सांगू लागला, मात्र रेल्वेच्या अधिकार्‍यांनी शॉर्टसर्किट झाले असेल असे म्हणून सर्वानी त्याला वेड्यात काढले. परंतु मोहम्मदने सगळ्यांना टेबलाखाली, लपा, अशी विनंती करून लागला.

- Advertisement -

त्यादिवशीचे भयाण सत्य सांगताना तो सांगतो, तो दिवस आजही लक्षात आल्यावर अंगावर काटा उभा राहतो. कसाब तिकीट खिडकीजवळ जेव्हा आला, त्यावेळी आता आपलापण अंत होणार असेच वाटते होते. त्याने तिकीट खिडकीजवळ काचेवर बेछूट गोळीबार केला, मी त्याच्या समोरच होतो. मी दुसरी गोळी चुकवली आणि खिशातला मोबाईल काढून रेल्वे पोलिसांच्या माझा ओळखीच्या अधिकार्‍यांना फोन लावला. या घटनेची माहिती दिली. काही वेळात गोळीबार शांत झाल्यावर मी खोलीच्या बाहेर आलो आणि जमेल तशी जखमींना मदत करू लागलो. या सगळ्या मदतीत रात्र कशी गेली ते कळलेच नसल्याचे तो सांगतो.

त्या कटू आठवणीनंतर दुसर्‍या दिवशी मी माझा स्टॉलवर गेलो, जेवढ्यांना चहा देता येणे शक्य होते, तेवढ्याना चहा दिला. त्या परिसरात माझे एकमेव दुकान सुरु होते. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी बोलावून माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. छोटू तु खूप चांगले काम केलेस, अनेकांचे जीव वाचविले, असे सांगत त्यावेळी माझा सत्कार देखील झाला. इतकेच नव्हे तर माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांनीही नोकरी देण्याचे आश्वासन देत गौरव केला. पण हे फक्त आश्वासन राहिले असून आज त्याच्या आयुष्याची दुसरी परीक्षा सुरु झाली आहे.

- Advertisement -

त्यावेळी रेल्वेने आपल्याला ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले आणि नोकरीवर लावण्याचे प्रयत्न करु असे आश्वासन देखील दिले. यासाठी तो गेल्या १० वर्षांपासून रेल्वे दरबारी खेटा मारत आहे. ज्याने त्याच्या जीवाची पर्वा न करता इतरांसाठी आपला जीव धोक्यात घातला. त्याला सरतेशेवटी पोट भरण्यासाठी नोकरीच्या शोधासाठी वणवण फिरावे लागत असल्याने त्याच्या चेहर्‍यावर हतबलता दिसून आली. त्याच हतबलतेने तो म्हणाला, सगळे म्हणतात, तुझी फाईल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आली. ज्यांनी आश्वासन दिले त्यांना विचार अशी उडवाउडवीचे उत्तरे देखील देतात. अनेक नेते- मंत्री सगळ्यांकडे सत्काराचे फोटो, बातम्या दाखवून झाल्या, पण कोणीही काही करत नाही, अशी खंत देखील छोटून यावेळी पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी यावेळी बोलून दाखविली. माझ्यावर बातमी करु नका, मला नोकरी द्या, अशी मागणी ही त्याने आपलं महानगरकडे बोलून दाखविली.

छोटूवर आणि २६/११ लवकर येणार चित्रपट

छोटू च्या जीवनावर लवकरच चित्रपट येणार आहेत. या चित्रपटा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनाक्रम सुद्धा राहणार आहे. छोटू चित्रपटा काम करण्याची इच्छा नव्हती. मात्र आर्थिक तंगी असल्यामुळे छोटूने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रसिद्ध दिगदर्शक गिरीश पटेल हे छोटूवर आणि २६/११ वर हा चित्रपट बनविणार आहेत. या चित्रपटाची कथा नामाकिंत अनिकेत सावंत यांनी लिहली आहेत. अशी माहिती स्वता छोटू उर्फ मोहम्मद तौफिक शेख यांनी दैनिक आपलं महानगरशी बोलताना दिली आहेत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -