घरमुंबईआणि त्या महिलेचे लाखो रुपयांचे दागिने परत मिळाले

आणि त्या महिलेचे लाखो रुपयांचे दागिने परत मिळाले

Subscribe

लोकलमध्ये विसरलेली बॅग अवघ्या काही तासात शेाधून त्या बॅगेतील १ लाख ३६ हजाराचे सोन्याचे दागिने एका महिला प्रवासीला परत केल्याची कामगिरी डोंबिवली लेाहमार्ग पोलिसांनी केली आहे.

प्रवासादरम्यान लोकलमध्ये विसरलेली बॅग अवघ्या काही तासात शेाधून त्या बॅगेतील १ लाख ३६ हजाराचे सोन्याचे दागिने एका महिला प्रवासीला परत केल्याची कामगिरी डोंबिवली लेाहमार्ग पोलिसांनी केली आहे. पोलीस हवालदार अनिल जावळे आणि पोलीस नाईक शंकर ढाणे महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला गायकवाड या तिघांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

अशी परत केली बॅग

मुंबईतील विद्याविहार येथे राहणाऱ्या श्वेता राजे या बुधवारी दुपारच्या सुमारास विद्याविहारहून कोपरकडे येण्यासाठी त्यांनी टिटवाळा लोकल पकडली. यावेळी त्यांच्या सोबत दागिने असलेली बॅग आणि लहान मुल होते. मात्र घाईगडबडीत त्या कोपरला उतरल्या मात्र बॅग लोकलमध्ये विसरल्या. लोकल सुटल्यानंतर बॅग विसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस हवालदार अनिल जावळे आणि पोलीस नाईक शंकर ढाणे महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला गायकवाड यांनी गहाळ झालेल्या बॅगेचा शोध सुरू केला.

- Advertisement -

टिटवाळा लोकल असल्याने डोंबिवली रेल्वे पोलिसांनी तिथल्या स्टेशन मास्तरांशी संपर्क साधला. मात्र टिटवाळा लोकल पुन्हा सीएसटीकडे रवाना झाल्याचे समजले. टिटवाळा लोकलची वाट पाहत ते डोंबिवली स्थानकात थांबले. फलाट क्रमांक ३ वर टिटवाळा लोकल आल्यांनतर त्यांनी महिला डब्ब्यात जाऊन बॅगेचा शोध घेतला. त्यावेळी लोकलच्या डब्ब्यात बॅग आढळून आली. पोलिसांनी ही बॅग ताब्यात घेऊन शहानिशा केल्यानंतर महिला प्रवासी राजे यांना परत केली. बॅगेतील दागिने सुखरूप असल्याचे पाहिल्यानंतर राजे यांचा जीव भांडयात पडला. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. डोंबिवली पोलिसांनी ती बॅग राजे यांच्या स्वाधीन केले त्यावेळी त्यांनी पोलिसांचे आभार मानले.


वाचा – रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; सोन्याच्या दागिन्याची बॅग केली परत

- Advertisement -

वाचा – नागपूरकरच्या मदतीला धावले विलेपार्ले पोलीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -