घरमुंबईडोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल धोकादायक

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल धोकादायक

Subscribe

डोंबिवली पूर्व आणि पश्चिममेला जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

कल्याण पत्रीपुलाच्या संथगतीने कामामुळे कल्याणकर मेटाकुटीला आले असताना आता दुसरीकडे डोंबिवलीकरही वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकण्याची शक्यता आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिममेला जोडणारा रेल्वेवरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मुंबई आयआयटीने स्ट्रक्चरल ऑडिट करत हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल रेल्वे प्रशासनाला दिला आहे. रेल्वे प्रशासनाने कल्याण डोंबिवली महापालिकेला पूल धोकादायक झाल्याचे पत्राने कळवले आहे. त्यामुळे २७ मे पासनू या उड्डाणपुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

क्षमता, वाहतूक कोंडीमुळे पूल धोकादायक

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर रेल्वे उड्डाणपूल हा एकमेव पूल होता. या पुलाची क्षमता आणि होणारी वाहतूक कोंडी यामुळे हा पूल धोकादायक बनत चालला होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने स वा जोशी हायस्कूल येथे रेल्वे उड्डाणपूल उभारला आहे. गेल्या दोन वर्षापासून हा पूल सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून या पुलावरील ताण थोडासा कमी झाला होता. मात्र वाहतूकीची कोंडी ही दोन्ही पुलावर होत असल्याने वाहन चालक व डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. आता हा पूलच धोकादायक झाल्याचे पत्र रेलवे प्रशासनाने पालिकेला दिल्याने या पुलाच्या वाहतुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे हा पूल बंद केला जाणार असल्याने सर्व वाहतूक स. वा. जोशी हायस्कूलमार्गे बाहेर पडणार आहे. या परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार आहे.

- Advertisement -

डोंबिवलीकरांची अवस्था ही कल्याणकरांप्रमाणे

सध्या दोन्ही पुलावरून वाहतूक सुरू असतानाही या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. आता एक पूल बंद झाल्यानंतर या पुलावरूनच सर्व वाहने पूर्व व पश्चिमेला ये-जा करणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडणार आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पत्रीपुल बंद करण्यात आला. त्याठिकाणी नवीन पुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने कल्याणकर वाहतूक कोंडीच्या नरक यातना भोगत आहेत. आता डोंबिवलीतील पूर्व-पश्चिमेला जोडणारा हा उड्डाणपूलही धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. रेल्वे प्रशासनानेही तातडीने कल्याण डोंबिवली महापालिकेला याबाबतचे पत्र पाठवले आहे. त्यामूळे वाहतुकीसाठी हा पूल बंद झाल्यास डोंबिवलीकरांची अवस्था ही कल्याणकरांप्रमाणे होऊ शकते. त्यामुळे याकडं पालिका रेल्वे आणि वाहतूक पोलीस लक्ष देतील का?, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -