घरमुंबईप्रदूषणाच्या समस्येने डोंबिवलीकर त्रस्त

प्रदूषणाच्या समस्येने डोंबिवलीकर त्रस्त

Subscribe

श्वसनाच्या आणि घशाच्या त्रासाने नागरिक हैराण

प्रदूषणाच्या यादीत डोंबिवली शहराचा क्रमांक राज्यात अग्रेसर असतानाच, गेल्या पंधरा दिवसांपासून पून्हा प्रदूषणाच्या समस्येने डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. एमआयडीसी परिसरातील खांबाळापाडा, भोईर वाडी, बोरी कॉलनी, ९० फिट रोड इत्यादी परिसरसह एमआयडीसी निवासी भागातील रहिवाशी प्रदूषणाच्या उग्र वासाने त्रस्त झाले आहेत. त्यामुळे श्वसनाचे त्रास, घशाचे विकार आणि डोळे चुरचुरणे इत्यादी तक्रारी खूपच वाढल्या आहेत. वाढत्या प्रदूषणाच्या त्रासाने नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळावर धाव घेऊन अधिका-यांना जाब विचारला. मात्र प्रदूषणाची समस्या ही डोंबिवलीकरांच्या जीवावर आली असतानाही ती संपविण्यासाठी प्रशासन लोकप्रतिनिधींमध्ये उदासिनता दिसून येत आहे.

- Advertisement -

प्रदूषित कंपन्यांवर कारवाई करा; रहिवाशांची मागणी 

एमआयडीसी परिसरात अनेक रासायनिक कंपन्या आहेत. या कंपन्यांतून सोडला जाणा-या प्रदूषणाच्या उग्र वासामुळे डोंबिवलीकर त्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून खांबाळापाडा, भोईर वाडी, बोरी कॉलनी, ९० फूट रोड इत्यादी परिसरासह एमआयडीसी निवासी भागातील हजारो नागरिकांना प्रदूषणाच्या प्रचंड दर्पाचा सामना करावा लागत आहे. दिवसेंदिवस हा त्रास वाढत असल्याने उग्र वासामुळे नागरिक आजारी पडू लागले आहेत. लहान मुलांनाही प्रचंड त्रासाला सामारे जावे लागत आहे. वाढत्या प्रदूषामुळे संतप्त नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळावर धाव घेऊन कल्याण प्रादेशिक अधिकारी लक्ष्मण वाघमारे यांना जाब विचारला. या वासामुळे श्वास गुदमरने, घशाचे विकार, डोळे चुरचुरने आदी त्रासाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. शेकडो नागरिकांना डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे प्रदूषित कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांनी अधिका-यांकडे केली.

- Advertisement -

प्रदूषित पाण्यामुळे उग्र दर्पाचा सामना 

वाघमारे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत प्रदूषण मंडळाचे अधिकारी विशाल मुंडे यांना पाठवून सदर विभागाची पाहणी केली. त्यावेळी नाल्याच्या ड्रेनेज लाईन अनेक ठिकाणी फुटल्याने रासायनिक सांडपाणी नाल्यातून वाहत असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. त्यामुळे या प्रदूषित पाण्यामुळे उग्र दर्पाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तसेच रहिवाशांनी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. व नादुरूस्त ड्रेनेज पाईपची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी केली. ननावरे यांनीही संबधित अधिकाऱ्यांना पाहणी करण्यास सांगून ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे आदेश दिले आहेत.


क्रिकेटपटूचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -