घरमुंबईडोंगरी दुर्घटना : किंकाळ्या, आक्रोश, चिंता आणि मदत!

डोंगरी दुर्घटना : किंकाळ्या, आक्रोश, चिंता आणि मदत!

Subscribe

डोंगरी इमारत दुर्घटनेनंतर आसपासच्या परिसरात आणि जे. जे. हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आणि स्वयंसेवक मुंबईकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येकजण मदतीसाठी सज्ज होता!

घटनास्थळी अडकलेल्या लोकांची वाचवण्यासाठी आर्त हाक, नातेवाईकांच्या किंकाळ्या आणि तोंडावर चिंता हे वातावरण मंगळवारी सकाळपासूनच जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळत होते. प्रत्येक जण तिथे अडकलेल्यांपैकी रहिवाशांना हॉस्पिटलपर्यंत कसं पोहोचवायचं याच्याच धावपळीत होता. पण, छोटी वा मोठी कोणतीही दुर्घटना असो, मदतीचा हात पुढे करण्याचं आणि मुंबईकरांचं ‘स्पिरीट’ मंगळवारी पुन्हा एकदा डोंगरी इमारत दुर्घटनेत दिसून आलं.

जे. जे. हॉस्पिटलमध्ये शेकडोंची गर्दी

घटनास्थळी आणि जे.जे. हॉस्पिटलच्या कॅज्युअल्टीबाहेर रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटलचे कर्मचारी जखमी झालेल्यांना रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यासाठी तात्काळ पुढे सरसावून उपचारांसाठी नेण्याकरीता मदतीचा हात पुढे करत होते. कॅज्युअल्टीच्या आवारात जखमींचे नातेवाईक आणि डोंगरी परिसरातील शेकडो रहिवासी जमा झाले होते. त्यांच्यात चर्चा सुरु होती ती, दुर्घटना कशामुळे झाली याची आणि येथे जे जखमी येतील त्यांना कोणतीही मदत कशी करता येतील याची. कारण, दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील रहिवाशांचा संसार उध्वस्त झाला होता, तर अनेकांनी आपले जीवलग गमावले होते.

- Advertisement -

डोंगरी दुर्घटना: अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ बघा

स्थानिक मुंबईकर मदतीसाठी सरसावले!

या रहिवाशांचे बरेच घोळके आणि काही महिला एकत्र जमून याबद्दल आणि ही दुर्घटना का घडली? कोणाचे नातेवाईक गमावले? आणि कोण सुदैवाने वाचलं? याबद्दल गंभीरपणे सांगत होत्या. अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन कानावर पडला की, रस्त्यावरील वाहतुकीचा ओघ रोखण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक वाहतूक पोलिसांना मदत करत होते आणि इतरवेळी वाहतुकीचे नियोजनही करताना दिसले. पण या डोंगरी इमारत दुर्घटनेने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न तीव्रतेनं विचारला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -