घरमुंबईकोडिंगच्या जाहिरातींकडे लक्ष देऊ नका - शिक्षणमंत्री

कोडिंगच्या जाहिरातींकडे लक्ष देऊ नका – शिक्षणमंत्री

Subscribe

केंद्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे याकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला.

राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केल्यानंतर त्यासंदर्भातील अनेक माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आधार घेत इयत्ता सहावीपासून कोडिंग अनिवार्य असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच केंद्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे याकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिला.

कोरोनामुळे सध्या ऑनलाईनल शिक्षणचा श्रीगणेशा करण्यात आला. ऑनलाईन शिक्षणाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता भविष्यात ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कोडिंग शिकावे लागणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातही याचा समावेश करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या जाहिराती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या जाहिरातींबरोबरच अनेक कंपन्यांनी कोडिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी क्लासेसही सुरू केले आहेत. कोडिंगचा क्लास लावण्यासाठी पालकांच्या मागे ऑनलाईन जाहिरातींच्या माध्यमातून ससेमिरा लावण्यात येत आहे. त्यामुळे पालकांचा गोंधळ उडत असून, त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाले आहे. त्यामुळे काही पालकांनी यासंदर्भात काही पालकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे विचारणा केली. त्यावर गायकवाड यांनी या सर्व जाहिरातींना बळी पडू नका राज्य शासनाकडून असा कोणताही नर्णय झालेला नाही असे स्पष्ट करत पालकांना दिलासा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -