घरमुंबईएसटीत शीघ्रकोपी अध्यक्ष नको रे देवा!

एसटीत शीघ्रकोपी अध्यक्ष नको रे देवा!

Subscribe

सर्वाधिक तोटा रावतेंच्या कार्यकाळात,4 हजार 549 कोटींचा संचित तोटा

माजी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे सर्वाधिक तोटा सर्वसामान्यांच्या एसटी महामंडळाला झाला आहे. त्यांच्या कार्यकाळामुळे एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे यंदातरी एसटीत शीघ्रकोपी स्वभावाचा अध्यक्ष नकोच रे देवा, असे उद्गार एसटी महामंडळातील कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या मुखातून निघत आहेत. आजपर्यंत झालेल्या एसटी महामंडळाच्या अध्यक्षांमध्ये रावतेंच्या कार्यकाळात विक्रमी तोटा एसटीला झाला आहे. एसटीचा संचित तोटा सध्या 4 हजार 549 कोटींवर जाऊन पोहचला आहे.

2014 साली विधान सभा निवडणुकीत भाजप शिवसेनेची सत्ता राज्यात स्थापन झाली होती. तेव्हा परिवहन आणि एसटी महामंडळाची जबाबदारी शिवसेनेकडे देण्यात आली होती. तेव्हा शिवसेनेचे माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हाती एसटी महामंडळाची सूत्रे येताच ग्रामीण भागातील एसटीला ‘अच्छे दिन’ येणार अशी आशा सर्वांना वाटत होती. दिवाकर रावते यांनी ‘शिवशाही’ आणि ‘विठाई’सारखे मोठे प्रकल्प सुरू केले. एसटीची 18 टक्के भाडेवाढ करून एसटीचा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोटा कमी झाला नाही.

- Advertisement -

मार्च 2018 ते मार्च 2019 चे आर्थिक वर्ष संपले आहे. या एका वर्षात एसटीला 965 कोटी तोटा झाला आहे. रावतेंच्या कार्यकाळ सुरू होण्याच्या वेळी 2014-15 ला एसटीचा संचित तोटा 1685 कोटींचा असलेला तोटा आता 4 हजार 549 कोटींच्या घरात जाऊन पोहचला आहे. 2017-18 च्या अखेर एसटीला 3368 कोटींचा संचित तोटा होता. बघितले तर आतापर्यंत महामंडळाच्या अध्यक्षाचा कार्यकाळातील सर्वाधिक तोटा हा फक्त दिवाकर रावते यांच्या कार्यकाळासमोर आला आहे. त्याला कारणे सुध्दा खुप आहे. त्यामुळे येणारा एसटी महामंडळातील शीघ्रकोपी अध्यक्ष नकोरे बाबा..असे सूर निघत आहे.

दिवाकर रावते यांच्या काळात एसटीतील अनेक कामे खासगी कंत्राटदारांना दिल्यामुळे एसटी तोट्यात गेली आहे. पूर्वी वाहक चालकांचे गणवेशासाठीच्या कापडावर 20 कोटी रुपये खर्च येत होता.ते आता 63 कोटींचे कंत्राट खासगी कंपनीला दिले आहे. तसेच पूर्वी एसटी महामंडळाचे आगर, बस स्थानक आणि कार्यालये यांच्या स्वच्छतेसाठी साधारणत: 150 कोटी लागत होते.आज स्वच्छतेचे कंत्राट 463 कोटीत देण्यात आले आहे.

- Advertisement -

इतकेच नव्हे तर एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये हायटेक वातानुकूलित शिवनेरी, अश्वमेध व शिवशाही बसेसचा समावेश झाला आहे. या बस अपघातामध्ये नादुरुस्त झाल्यास त्या दुरुस्त करण्याची व्यवस्था आपल्या कार्यशाळेत नाही. त्यामुळे त्या बसेस खाजगी कार्यशाळेत दुरुस्त करण्यासाठी येणार्‍या खर्चामुळेसुद्धा एसटीला तोटा होत आहे.त्यामुळे खासगी कंत्राटदारांचे हित जपल्याने आज सर्वसामान्यांची एसटी तोट्यात गेली आहे, असा आरोप कर्मचारी वर्गाकडून होत आहे.

संचित -तोटा -तोटा
2014-15  -1685 -391 कोटी
2015-16 -1807 -121 कोटी
2016-17 -2330 -522 कोटी
2017-18 -3363 -1584 कोटी
2018-19 -4549 -965 कोटी

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -