घरमुंबईडॉ. आनंदीबाई जोशींच्या स्मारकाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

डॉ. आनंदीबाई जोशींच्या स्मारकाला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

Subscribe

देशातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणऱ्या आनंदीबाई जोशी यांचे कल्याण शहरात स्मारक व्हावे यासाठी अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरूच आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभावा असल्यामुळे स्मारकाचा विषय ठप्प पडला आहे.

देशातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळख असलेल्या डॉ. आनंदीबाई जोशी यांचे कल्याण शहरात स्मारक व्हावे यासाठी अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. आनंदीबाईचे स्मारक उभारण्यात इथल्या राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. कल्याणमध्ये गेली २४ वर्ष शिवसेना भाजपची सत्ता आहे. मात्र, अजूनही आनंदीबाईंच्या स्मारकाला मुहूर्त मिळालेला नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेंगाळलेल्या आनंदीबाईंच्या स्मारकाचा विषय चव्हाट्यावर आला आहे.

भूमिपूजन होऊनही स्मारकाचे काम ठप्प

आनंदीबाईंचे शिक्षण परदेशात झाले असले तरी त्या मुळच्या कल्याणच्या होत्या. स्त्री शिक्षणाविषयी जागृती नसतानाच्या काळात आनंदीबाई यांनी अमेरिकेत जाऊन आपले वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले होते. अशा कर्तृत्ववान महिलेचा आदर्श ठेवण्यासाठी ऐतिहासीक कल्याणनगरीत आनंदीबाईचे स्मारक व्हावे अशी मागणी कल्याणमधील अनेक संस्था व संघटनांनी केली होती. त्यामुळे आनंदबाईंचे स्मारक उभारण्यासाठी तत्कालीन भाजप नगरसेविका डॉ. शुभा पाध्ये यांनी २०१३ मध्ये स्थायीसमितीत ठराव मंजूर करून घेतला हेाता. महासभेतही त्याला मंजूरी देण्यात आली हेाती. कल्याणमधील रुक्मा बाई रुग्णालयात डॉ. आनंदीबाई जोशी यांचे अर्धपुतळा उभारण्याचे भूमिपूजन शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले होते. भूमिपूजन होऊन तीन वर्ष उलटली मात्र अजूनही स्मारक होऊ शकले नाही. त्यामुळे कल्याणकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

- Advertisement -

कल्याणकरांचा अपेक्षा भंग

डोंबिवलीच्या सुतिकागृहाला डॉ. आनंदीबाई जोशी यांचे नाव देण्याच्या सुचना खासदारांनी यावेळी केल्या होत्या. मात्र, डोंबिवलीचे सुतिकागृह अनेक महिन्यांपासून बंद पडले आहे. त्या जागेवर नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. पण सुतिकागृहाला नाव देण्याच्या कामाला अजून मुहूर्त मिळाला नाही आहे. त्यामुळे सुतिकागृह कधी उभारणार आणि आनंदीबाईचे नाव कधी देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. डॉक्टर आणि खासदार असलेल्या शिंदेकडून हा प्रश्न मार्गी लागेल अशी कल्याणकरांची अपेक्षा होती. पण ती अपेक्षा भंग होण्याच्या मर्गावर दिसत आहे.

राजकीय इच्छाशक्तीचा अभावा

पुतळा उभारण्यासाठी राज्यसरकारची एक समिती आहे, त्यांची मंजूरी घ्यावी लागते. पण पालिकेत तसेच राज्यात शिवसेना भाजपची सत्ता असतानाही आनंदीबाईंच्या पुतळयाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आनंदीबाई या कल्याणच्या असल्याने त्यांचे स्मारक कल्याणमध्येच व्हावे यासाठी काही सामाजिक संस्था व समाजसेवक अनिल काकडे अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहेत. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभावापोटी कल्याणात स्मारक पूर्ण झालेले दिसत नाही आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -