घरमुंबईटाटाच्या डॉ. कैलास शर्मा यांची 'एमसीआय'च्या मंडळावर नियुक्ती

टाटाच्या डॉ. कैलास शर्मा यांची ‘एमसीआय’च्या मंडळावर नियुक्ती

Subscribe

टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (शैक्षणिक) डॉ. कैलास शर्मा यांची भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या कार्यकारी मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे.

एमसीआय म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या कार्यकारी मंडळावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (शैक्षणिक) डॉ. कैलास शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर सदस्य (बोर्ड ऑफ गव्हनर्स) म्हणून डॉ. कैलास शर्मा यांची नियुक्ती केली गेली आहे. पुढच्या दोन वर्षांसाठी त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी देखील डॉ. शर्मा मे २०११ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत कार्यकारी मंडळावर होते. तसंच, नोव्हेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१८ या काळात त्यांनी एमसीआयच्या पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार समितीवर कार्यरत होते. तर, नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर सध्या डॉ. शर्मा हे कार्यरत आहेत.

कर्करोग संस्थाचे मार्गदर्शक

एमसीआयच्या कार्यकारी मंडळावर कार्यरत असताना त्यांनी देशभरातील कॅन्सरसंदर्भातील ‘एमसीएच’ आणि ‘डीएम’ अभ्यासक्रमांच्या निर्मितीतून वेगवेगळ्या प्रशासकीय गोष्टींमध्ये योगदान दिलं आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेसह औरंगाबादच्या राज्य कर्करोग संस्थेचे आणि इतर ठिकाणच्या कर्करोग संस्थाचे मार्गदर्शक तसंच राज्य सरकारचे समन्वयक म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

- Advertisement -

माझं लक्ष राज्यातील वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेचा दर्जा सुधारण्याकडे असेल. राज्य सरकारला एमबीबीएस आणि पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवण्यासाठी मदत करण्यावर माझा भर राहील. त्याचसोबत सुपर स्पेशालिटीमध्ये डीएम निओनॅटोलॉजी, डीएम पल्मनरी मेडिसीन, डीएम इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी आणि डीएम क्रिटीकल मेडिसीन हे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यावर भर देण्यात येईल.  – डॉ. कैलाश शर्मा; टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक (शैक्षणिक)


हेही वाचा – आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांचा असमतोल वाढला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -