घरमुंबईडॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल

Subscribe

जामिनावर २५ जुलैला सुनावणी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी डॉक्टर हेमा अहुजा, अंकिता खंडेलवाल, भक्ती मेहरे यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेकडून जवळपास १२०३ पानांचे आरोपपत्र विशेष सत्र न्यायालयात मंगळवारी दाखल करण्यात आले. या आरोपपत्रात २७४ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आलेली आहेत. अटकेत असलेल्या तिन्ही डॉक्टरांच्या जामिनावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

डॉ. पायल तडवी हिने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

या प्रकरणी या तिघींना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला असून गुन्हे शाखेला पायलने लिहलेली सुसाईड नोट मिळून आलेली आहे, तसेच साक्षीदार, पुरावे या तिघींविरुद्ध गुन्हे शाखेला मिळाले आहेत. मंगळवारी गुन्हे शाखेने या तिघींविरुद्ध १२०३ पानांचे आरोपपत्र विशेष सत्र न्यायालयात दाखल केले. यामध्ये २७४ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. अटकेत असलेल्या डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि अंकिता खंडेलवाल यांच्या जामिनावर २५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

गुन्हे शाखेला पायलच्या मोबाईलमध्ये तीन पानांची सुसाईड नोट मिळली. त्यात तिने तिघींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. सुसाईड नोटमध्ये तिघींच्या नावाचा उल्लेख करून त्यांनी केलेल्या छळाचा उल्लेख केला आहे. पायलने आई वडील आणि पती सलमानकडे तिने घेतलेल्या या निर्णयाबद्दल माफी मागितली आहे. तीन पानांची सुसाईड नोट इंग्रजी भाषेत लिहिलेली असून त्यात तिने आदल्या दिवशी (२१ जून) रोजी पायल मैत्रिणीसोबत बाहेरून जेवून आली. त्यानंतर त्यांनी काढलेल्या सेल्फीवर या तिघींकडून मोबाईलवर कशाप्रकारे टोमणे मारण्यात आले होते याचाही उल्लेख केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -