डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपींना जामीन नाही

सुनावणी दरम्यान कोर्टाने गुन्हे शाखेला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Mumbai
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तिन्ही डॉक्टरांना जामीन नाही. तिन्ही डॉक्टरांच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान कोर्टाने गुन्हे शाखेला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी १० जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.


हेही वाचा – डॉ. पायल तडवी प्रकरण: तीनही महिला आरोपींना १० जून पर्यंत न्यायालयीन कोठडी


जामीनासाठी वकिलांनी केला अर्ज

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आरोपींच्या वकिलांनी कोर्टाकडे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी करत असताना कोर्टाने गुन्हे शाखेला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने १० जूनपर्यंत तहकूब केली.


हेही वाचा – पायल तडवी आत्महत्या प्रकरण: आयएमएची सत्य शोधक समिती स्थापन


आरोपींना १० जूनपर्यंत कोठडी

पायल तडवी आत्महत्या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी २३ मे रोजी तिन्ही डॉक्टरांविराधोत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. तिन्ही डॉक्टरांविरोधात पायलला आत्महत्येस प्रवृत्त करणे, रॅगिंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिघींना कोर्टात हजर केले असता त्यांना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

तपासासाठी सत्य शोधक समिती स्थापन

डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येचा कसून तपास व्हावा यासाठी आयएमए म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सत्य शोधक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती डॉ.पायला तडवी यांच्या आत्महत्येची पार्श्वभूमी आणि महत्त्वाच्या घटकांचं मूल्यमापन करणार आहे. निवासी डॉक्टरांवर आणि प्रामुख्याने सरकारी हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांवर कामाचा ताण असतो आणि त्यातून त्यांना नैराश्य येते. पण, डॉ. पायलच्या प्रकरणात, जातीय भेदभाव आणि कलंक हे आरोप करण्यात आले आहेत.