घरमुंबईडॉ. राजश्री कटके पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; मानसिक छळ केल्याचा डॉक्टरांचा आरोप

डॉ. राजश्री कटके पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; मानसिक छळ केल्याचा डॉक्टरांचा आरोप

Subscribe

निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ आणि कोणत्याही प्रकारच्या कामांसाठी पैशांची मागणी करणे अशा प्रकारच्या तक्रारी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने प्रशासनाकडे केल्या आहेत.

नुकतंच कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक पदावरून हटवून जे. जे रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात बदली केलेल्या डॉ. राजश्री कटके या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ आणि कोणत्याही प्रकारच्या कामांसाठी पैशांची मागणी करणे अशा प्रकारच्या तक्रारी निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने प्रशासनाकडे केल्या आहेत. त्यामुळे, डॉ. राजश्री कटके यांच्यावर चौकशी समिती बसवावी अशी मागणी करत जोपर्यंत त्यांच्यावरील आरोपांची चौकशी होत नाही. तोपर्यंत त्यांची बदली दुसऱ्या रुग्णालयात करावी असं ही पत्रात नमूद करण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

पत्रात केलेल्या मागण्या

– डॉ. राजश्री कटके यांच्यावर चौकशी समिती बसवावी.
– त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी मानसोपचार करावेत.
– शिक्षा म्हणून दुसऱ्या ठिकाणी बदली करावी.

- Advertisement -

तर शिक्षकांचा चेहरा काळा करु

त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीनुसार प्रोफेसर डॉक्टरांकडून परिक्षेत पास करण्यासाठी पैशांची आणि आपल्यासाठी काहीतरी करावं अशी मागणी करतात. केंद्रीय मार्डने अशा प्रोफेसर्सना अशा प्रकारची प्रॅक्टिस थांबवण्याची विनंती केली आहे. असं न केल्यास अशा डॉक्टरांचा चेहरा काळा करुन त्यांना जगासमोर आणू असा इशाराही मार्डने दिला आहे.

“डॉक्टरांचा शिक्षकांकडून छळ होण्याच्या अनेक तक्रारी प्रत्येक कॉलेजमधून येतात. पण, जे जे रुग्णालयातून आलेल्या या लेखी तक्रारीवरुन आम्ही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने यांना डॉ. कटके यांच्यावर चौकशी समिती बसवावी अशी मागणी केली आहे. जे.जे रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने तिच्यावर होणार्या छळाबाबत आम्हांला एक पत्र लिहिले आहे. त्यानुसार, आम्ही तिच्या बाजूने आहोत. अनेकदा डॉ. कटके यांनी त्या मुलीला त्यांच्या घरी बोलावून घराच्या बाहेर बसवलं होतं. त्यामुळे या अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्यावरुन त्यांच्यावर चौकशी समिती बसवावी अशी मागणी केली आहे. ” – डॉ. लोकेश चिरवटकर, अध्यक्ष, केंद्रीय मार्ड संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -