घरमुंबईबाबा आमटेंच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

बाबा आमटेंच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

Subscribe

शीतल आमटेंच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ

आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विषप्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शीतल आमटे यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

- Advertisement -

दरम्यान, डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्यही होत्या. यासह शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या. स्वत:ला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

- Advertisement -

आमटे कुटुंबीय आणि महारोगी सेवा समितीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे वृत्त आले होते. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होतं. त्यामध्ये त्यांनी आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. नंतर हा व्हिडिओ त्यांनी काढून टाकला होता.

त्यानंतर डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून शीतल आमटे यांच्या आरोपांशी सहमत नसल्याचे सांगितले होते. आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले होते. या पत्रकात डॉ. शीतल आमटे या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या व्हीडीओमध्ये सुधा अशी कबुली दिल्याचे या पत्रकात म्हंटले होते.

शीतल आमटे यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे पत्रक देण्यात येत असल्याचे आमटे कुटुंबीयांनी म्हंटले होते.

२० नोव्हेंबर रोजी FB Live करून साधला संवाद

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी २० नोव्हेबर २०२० रोजी फेसबुक लाईव्ह केले होते. याद्वारे संवाद साधताना, आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदनात सांगितल्या प्रमाणे महारोगी सेवा समितीच्या कामावर आणि विश्वस्तांवर आरोप केले होते. डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी या संभाषणात त्यांचे सख्खे भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आरोप केले. नंतर अर्ध्या तासाचे असणारे फेसबुकवरील लाईव्ह डॉ. शीतल यांनी डिलिट केले असल्याचीही माहिती मिळतेय.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा आमटे यांच्या कार्याचा वारसा मी आणि माझे पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही आमची भूमिका लवकरच जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती. मात्र तो व्हिडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं, असे डॉ. शीतल यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -