घरमुंबईऔषध वितरकांची बिले होणार मंजूर

औषध वितरकांची बिले होणार मंजूर

Subscribe

आरोग्य विभागाच्या आयुक्तांचे आश्वासन

राज्य सरकारकडून औषध वितरकांची 246 कोटींची बिले रखडल्याने वितरकांची अवस्था दयनीय झाली आहे. बिले लवकर मंजूर न झाल्यास वितरकांकडून औषध पुरवठा बंद होण्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा औषधांचा तुटवडा पडण्याची शक्यता होती. यासंदर्भातील बातमी ‘आपलं महानगर’ने प्रसिद्ध केल्यानंतर आरोग्य विभागाच्या आयुक्तांनी औषध वितरकांसोबत चर्चा केली आणि शुक्रवारी तातडीने बिले मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाअंतर्गत येणार्‍या राज्यातील 22 मेडिकल कॉलेज आणि आरोग्य सेवा विभागांच्या 25 सेंटरला औषध पुरवठा करण्याची जबाबदारी 2018 मध्ये हाफकिन बायो फार्मासिट्युकल कार्पोरेशनकडे सोपवण्यात आली. जानेवारीमध्ये वितरकांनी 246 कोटींच्या औषधांची बिले हाफकिनकडे दिल्यानंतर बिलाची 90 टक्के रक्कम लवकरच मंजूर होईल आणि उर्वरित 10 टक्के रक्कम महिनाभरात मंजूर होईल, असे सांगण्यात आले. मात्र तीन महिने उलटले तरी बिले मंजूर न झाल्याने कंपन्यांचे बिले देणे, कर्मचार्‍यांचा पगार देणे, जीएसटीची रक्कम भरणे तसेच 31 मार्चपर्यंत आयकर भरण्यासाठी पैसे नसल्याने वितरकांसमोर व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे बिले 31 मार्चपूर्वी मंजूर न झाल्यास राज्य सरकारला करण्यात येणारा औषधांचा पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला.

- Advertisement -

औषध वितरकांनी दिला होता. औषध पुरवठा बंद झाल्यास राज्यामध्ये पुन्हा औषधांचा तुटवडा उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात ‘आपलं महानगर’मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाचे आयुक्त अनुप कुमार यादव यांनी औषध वितरकांना तातडीने याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र आयुक्तांनी लेखी आश्वासन द्यावे, असा पवित्रा घेत वितरकांनी 28 मार्चला हाफकिन बायो फार्मासिट्युकल कॉर्पोरेशनमध्ये जोरदार धरणे आंदोलन केले. आयुक्तांनी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्णय वितरकांनी घेतला. यावर आयुक्त अनुप कुमार यादव यांनी वितरकांची भेट घेत त्यांना हाफकिन बायो फार्मासिट्युकल कार्पोरेशनच्या महाव्यवस्थापकपदी डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती झाली. ते 10 एप्रिलला पदभार स्वीकारणार आहेत. त्यानंतर तुमची बिले मंजूर करण्यात येतील असे सांगितले.

परंतु वितरकांनी आमची बिले मंजूर न झाल्यास आम्हाला व्यवसाय करणे अवघड होऊन बसेल, असे आयुक्तांना सांगत 31 मार्चपूर्वीच बिले मंजूर करण्याची विनंती केली. औषध वितरकांची विनंती मान्य करत अनुप कुमार यादव यांनी अखेर 28 मार्चला दिवसभरात सर्व औषध वितरकांची बिले मंजूर करण्यात येतील, असे आश्वासन दिले, अशी माहिती ऑल फूड अ‍ॅण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -