Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम NCBची मोठी कारवाई! सुप्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्रीच्या मॅनेजरला अटक!

NCBची मोठी कारवाई! सुप्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्रीच्या मॅनेजरला अटक!

Related Story

- Advertisement -

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास एकीकडे अजूनही सुरूच असताना दुसरीकडे या प्रकरणातून समोर आलेल्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी आता बॉलिवुडच्या अनेक दिग्गजांच्या घरापर्यंत पोहोचू लागली आहे. NCB अर्थात अंमली पदार्थविरोधी पथकाने आज केलेल्या मोठ्या कारवाईमध्ये एका सुप्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्रीच्या मॅनेजरला अटक केली आहे. राहिला फर्निचरवाला असं या मॅनेजरचं नाव असून तिची बहीण शाहिस्ता फर्निचरवाला हिला देखील एनसीबीनं अटक केली आहे. या दोघींना आंतरराष्ट्रीय ड्र्ग्ज माफिया करन सजनानी याला आर्थिक आणि इतर पुरवठ्याशी संबंधित गोष्टींसाठी मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

कशी झाली कारवाई?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला ड्रग्ज पेडलर अनुज केशवानीला करन सजनानी ड्रग्ज पुरवायचा. त्याच्याच तपासानुसार पोलिसांनी करन सजनानीच्या मुंबईतल्या खार पश्चिम येथील जसवंत हाईट्समधल्या घरी धाड टाकली. यावेळी पोलिसांना तब्बल २०० किलो गांजा आणि त्यासोबत इतर गांजामिश्रीत पदार्थ सापडले आहेत. या आधारावर पोलिसांनी राहिला आणि शाहिस्ता या दोन्ही बहिणींना देखील अटक केली आहे. या दोघींकडे गांजा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

Rahila Furniturewala Shaista Furniturewala karan sajnani ganja arrested
करनच्या फ्लॅटमधून २०० किलो गांजा जप्त करण्यात आला.

कोण आहे करण सजनानी?

करण सजनानी हा ब्रिटिश नागरिक असून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे. करण अमेरिकेतून मोठ्या प्रमणावर ड्रग्ज आणायचा. त्यानंतर मुंबईत त्यात गांजा मिसळून मुंबईतल्या उच्च वर्गातील ग्राहकांना हे विकलं जात होतं. या सर्व प्रकरणात राहिला आणि तिची बहीण करण सजनानीला आर्थिक आणि इतर सर्व मदत करत होती. एनसीबीची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

- Advertisement -