घरमुंबईदारुड्यांनी मेट्रो ट्रेनमध्ये पसरवली बॉम्बची अफवा; प्रवाशांमध्ये गोंधळ

दारुड्यांनी मेट्रो ट्रेनमध्ये पसरवली बॉम्बची अफवा; प्रवाशांमध्ये गोंधळ

Subscribe

दोन दारुड्यांनी मेट्रो ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवून एकच खळबळ उडवून दिली.

दोन दारुड्यांनी मेट्रो ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवून एकच खळबळ उडवून दिली. दोघा दारुड्यांचा या गोंधळामुळे मेट्रो प्रवाशांची काही मिनीटं भीतीने तारांबळ उडाली. अखेर मेट्रो सुरक्षा रक्षकांनी या दारुड्याना ताब्यात घेऊन अंधेरी पोलिसांच्या ताब्यात दिले. या गोंधळामुळे मेट्रोला अंधेरी स्थानकातून निघायला काही मिनिटे उशिर झाला. योगेश प्रसाद आणि रामेश्वर चौरासीया असे या दोघा दारुड्यांची नावं आहेत. साकिनाका चांदीवली परिसरात राहणारे हे दोघे सुताराचे काम करतात.

दारूच्या नशेत करत होते बडबड 

गुरुवार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी हे दोघे अंधेरी येथून काम संपवून दारूच्या नशेतच असल्फा येथे येण्यासाठी डी. एन. नगर येथून मेट्रो पकडली होती. दोघेही प्रवासाच्या दरम्यान एकमेकांसोबत जोरजोरात बोलत होते. त्याच वेळी एकाने मेट्रो मे बॉम्ब रखा है, असे शब्द वापरले आणि तेच शब्द काही प्रवाशांच्या कानावर जाताच एकच गोंधळ उडाला. मेट्रो ट्रेन अंधेरी स्थानकात येताच मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांनी या दोघांना ताब्यात घेऊन ट्रेनमधून खाली उतरवले असता दोघेही दारूच्या नशेत तररर होते. सुरक्षा रक्षकांनी हे दोघे दारूच्या नशेत बडबडत होते, ही खात्री केल्यानंतर ट्रेन घाटकोपरच्या दिशेने सोडण्यात आली.

- Advertisement -

दोघांविरोधात तक्रार दाखल 

या दोघांना अंधेरी पोलिसांच्या ताब्यात देऊन त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मेट्रो सुरक्षा रक्षक अधिकारी बाबू कसबे यांनी सांगितले. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी योगेश प्रसाद आणि रामेश्वर चौरासीया या दोघांवर दिल्‍ली मेट्रो रेलवे अधिनियम २००२ कलम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -