घरमुंबईकोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार

Subscribe

७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला

दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे पार पडत असते, पंरतू राज्यावर असलेले कोरोनाचे संकट आणि राज्यातील कोरोनाची परिस्थिती बघता नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेण्याचा निर्णय झाला आला. दरम्यान मुंबईत विधानभवनात दोन्ही सभागृहाच्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली.

यावेळी ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला. तसेच बैठकीत हिवाळी अधिवेशनासाठी लागणाऱ्या सुविधांचाही आढावा घेण्यात आला. अनेक विधिमंडळ सदस्यांनी नागपूर येथे कोविडच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन घेणे उचित होणार नाही अशा सूचना यावेळी केल्या.

- Advertisement -

बैठकीला विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे देवेंद्र फडणवीस संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातील सदस्य, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य, विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विरोधकांचा आक्षेप

अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपुरात घेण्यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहेत. कायद्याप्रमाणे वर्षातील एक अधिवेशन हे नागपुरात घ्यावे, अशी मागणी भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे. ते म्हणाले की, “किमान १५ दिवस हे अधिवेशन व्हावे ही आमची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशन कालावधी कमी ठेवायचा, चर्चा फार करायची नाही अशी सरकारची भूमिका दिसत आहे. पळ काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. किमान अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपूरला व्हावे ही आमची मागणी होती.”


हिवाळी अधिवेशन नागपूरमध्येच घ्या, भाजप आमदारांची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -