घरमुंबईFB Live: अपुऱ्या सुविधांमुळे मराठी शाळांचा टक्का घसरला - शिक्षकांची खंत

FB Live: अपुऱ्या सुविधांमुळे मराठी शाळांचा टक्का घसरला – शिक्षकांची खंत

Subscribe

शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी हे दोन्ही शिक्षक सहभागी झाले होते. त्यामध्ये मराठी शाळांचा टक्का घसरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड केली जात नाही. पण सुविधा कमी आहेत. त्यामुळे त्या सुविधा मिळणं गरजेचं आहे. सुविधा मिळाल्यास, मराठी शाळादेखील नक्कीच पुढे जातील अशी खंत व्यक्त करत शिक्षक साहेबराव महाजन आणि अनिल बोरनारे यांनी ‘माय महानगर’च्या फेसबुक लाईव्हमध्ये मत मांडले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी हे दोन्ही शिक्षक सहभागी झाले होते. दरम्यान आपण आपली व्यवसायिकता टिकवली पाहिजे. आपले ज्ञान अपडेट आणि अपग्रेड केले पाहिजे. पारदर्शकता ठेवण्यासाठी ज्या काही अटी आहेत, त्या शिक्षकांनी असलेल्या अटी व्यवस्थित पूर्ण केल्या तर काहीच अडचण येणार नाही असंही मत यावेळी दोन्ही शिक्षकांनी मांडले.

सध्या शिक्षकांना बरीच अशैक्षणिक कामेही दिली जातात. त्यासंदर्भात शिक्षणहक्क कायद्यानुसार ऑनलाईन कामामध्ये शिक्षकांना फक्त तीन प्रकारची अशैक्षणिक काम देऊ शकता येतात ज्यामध्ये निवडणुकीची कामे, जनगणना करण्याचे काम आणि तिसरे म्हणजे नैसर्गिक आपत्ती हे तीन घटक येतात. मात्र असे असतानाही वारंवार कायद्याचं उल्लंघन करण्यात येत आहे. स्वतंत्र व्यवस्था कुठेही नाही अशी खंत यावेळी अनिल बोरनारे यांनी व्यक्त केली. तर, शिक्षक अशैक्षणिक कामात गुंतला गेल्यास, ऑनलाईन कामात अडकल्यास, विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यात येत नाही. मुलांचं नुकसान झाल्यास, शिक्षकांवर ठपका देण्यात येतो असं मत साहेबराव महाजन यांनी मांडले.
शिक्षक मुलांना कडक शिक्षा देतात आणि त्यानंतर महाराष्ट्रात अनेक घटना घडताना दिसत आहेत या प्रश्नावर उत्तर देताना कुठेतरी एखादी घटना घडली म्हणजे महाराष्ट्रातील सगळे शिक्षक तसेच आहेत का? असा सवाल अनिल बोरनारे यांनी उपस्थित केला. शिक्षण कायद्यात शारीरिक इजा होऊ नये हे नमूद आहे. कुठेतरी एखाद्या ठिकाणी चुकीचं घडल्यानंतर सर्व शिक्षकांवर ठपका ठेवणं चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटले. बदल एकाच दिवशी होऊ शकणार नाहीत. प्रत्येक विषयानुरुप शिक्षक दिले जात नाहीत. एकाच शिक्षकाला दोन ते तीन विषय शिकवला जात आहे. त्यामुळे शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे असल्याचेही दोन्ही शिक्षकांनी सांगितले.
विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक असणं गरजेचं आहे. तुकडी संकल्पना रद्द होऊन विद्यार्थी संख्या ही संकल्पना राबवली जात आहे. सदोष संच मान्यतेनुसार शिक्षक मिळालेले नाहीत. बरचसे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. तर, राज्यात सेल्फ माध्यमाच्या धोरणाचा सर्वच शाळांना फटका बसत आहे. गुणवत्ता आहे का? हे पालक बघत नाहीत. गेल्या चार वर्षापासून पालक सेमी इंग्रजीकडे पालक वळत आहेत. मुंबईतील काही शाळांनी इंग्रजी प्रथम भाषा म्हणून आता स्वीकारली आहे. इंग्रजी फाडफाड बोलणं म्हणजे गुणवत्ता नव्हे असं परखड मतही यावेळी अनिल बोरनारे यांनी मांडले. शाळेचा विचार करण्याआधी पाल्याचा विचार करावा. आठ पद्धतीच्या बुद्धिमत्ता आहेत. त्यामुळे त्यानुसार पाल्याचा विचार करून शाळेचा विचार करावा असे साहेबराव महाजन यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -