घरमुंबईसर्व्हर डाऊन झाल्याने वाशीमधील उपप्रादेशिक कार्यालयातील कामे ठप्प

सर्व्हर डाऊन झाल्याने वाशीमधील उपप्रादेशिक कार्यालयातील कामे ठप्प

Subscribe

नागरिकांची कामे जलद व सुलभ रीतीने व्हावीत म्हणून शासनाच्या बहुतांशी कार्यालयात ऑनलाईन प्रणालीद्वारे कामे सुरू झाली आहेत. परंतु ऑनलाईन कामाचा फटका कधी कोणाला बसेल याचा नेम नाही. सध्या याचा अनुभव वाशीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात येत आहे. या कार्यालयाचा आठ दिवसांपासून सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सर्व कामेच ठप्प झाल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे पर्यायी उपाय शोधावा, अशी मागणी नवी मुंबई रिक्षा चालक मालक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी केली आहे.

वाशी उपप्रादेशिक कार्यालयाचा सर्व्हर डाऊन साधारणतः 4 फेब्रुवारी पासून झाला आहे. त्यामुळे या कार्यालयात सध्या तरी काही साधारण कामे सोडली तर कोणतेही काम होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नागरिक येतात सर्व्हर चालू झाला की नाही पाहतात व घरी जातात. यामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय व नाहक खर्च होत आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे रिक्षा चालक मालक वेल्फेअरचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी सांगितले. कामानिमित्त आलेले नागरिक तक्रार करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांच्याकडे जातात. परंतु ते कार्यालयात असतीलच याचा नेम नसल्याने नागरिकांना रिकामी हातांनी घरी जावे लागत आहे.

- Advertisement -

दुसरे वरिष्ठ अधिकारी असलेले सहाय्यक परिवहन अधिकारी सावंत यांच्याकडे तक्रार करण्यासाठी भेटले तर थेट आपल्या कानावर हात ठेवून तुम्ही वरिष्ठांशी बोला असे सहज सांगून मोकळे होतात. त्यामुळे नागरिकांना घरी जाण्याशिवाय पर्याय राहत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासाठी परिवहन आयुक्त कार्यालयाने इकडे लक्ष देण्याची नितांत गरज असल्याचे तिथे उपस्थित आरटीओ ग्राहक स्वप्नील जुनघरे यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -