घरमुंबईदसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच

Subscribe

उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीच्या धामधूम सुरु झाली असतानाच शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळाव्याला परवानगी मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या दसर्‍या मेळाव्याच्या परवानगीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली असून येत्या ८ ऑक्टोबरला शिवाजी पार्क येथे दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे शिवसेनेने रविवारी जाहीर केले आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या देखील घेण्यात आल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. मुंबईसह राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मुंबईसह देशातील राजकारणाचे शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्याकडे लक्ष लागून राहिलेले असते. यंदा हा मेळावा ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत आल्याने त्याला परवानगी मिळते का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यंदाचा हा दसरा मेळावा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन करणार असून विधानसभेतील शिवसेनेचे निर्विवाद विजयाचे रणशिंग यावेळी फुंकले जाण्याची शक्यता यावेळी व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेने आरे कार शेडला केलेला विरोध लक्षात घेता, उद्धव ठाकरे यावेळी कोणती भुमिका घेतात. याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. मुळात ठाकरे घराण्यातून पहिल्यांदाच आदित्य ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहे. त्यामुळे या दसर्‍या मेळाव्याला अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. या मेळाव्याला शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व शिवसेना नेते, उपनेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -