घरमुंबईई - रक्तकोष पोर्टलवर माहिती न दिल्यास लायसन्स होणार रद्द

ई – रक्तकोष पोर्टलवर माहिती न दिल्यास लायसन्स होणार रद्द

Subscribe

मुंबईतील रक्तपेढ्या ई-रक्तकोष पोर्टलचा वापर करत नसून त्यावर रक्त विषयक माहिती टाकण्यास टाळाटाळ करत असल्याचं समोर येत आहे.

आपातकालीन किंवा गंभीर आजारांच्या परिस्थितीत तात्काळ रक्त न मिळाल्यास रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. शिवाय, अनेकदा नातेवाईकांकडे रिप्लेसमेंट रक्त म्हणजे रक्ताच्या बदल्यात रक्ताची मागणी केली जाते जे की चुकीचे आहे. यासाठीच रक्तपेढीतील रक्ताची उपलब्धता आणि माहिती अगदी सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावी म्हणून सरकारने ई-रक्तकोष नावाची वेबसाईट सुरू केली. पण, मुंबईतील रक्तपेढ्या ई-रक्तकोष पोर्टलचा वापर करत नसून त्यावर रक्त विषयक माहिती टाकण्यास टाळाटाळ करत असल्याचं समोर येत आहे.

५० टक्के रक्तपेढ्या माहिती देत नाहीत

सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त ५० टक्के रक्तपेढ्या या पोर्टलवर रक्ताविषयी माहिती देत नसल्याचंही समोर आलं आहे. रक्तपेढ्यांच्या निष्काळजीपणावर आरोग्य सेवेचे आयुक्त संतप्त झाले आहेत. या पोर्टलवर रक्तपेढ्यांनी माहिती न भरल्यास त्यांचे लायसन्स रद्द करण्यात येईल, अशी तंबीच आयुक्तांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

पोर्टलला अल्टिमेटम जारी 

केंद्र रक्त संक्रमण परिषदेकडून प्रत्येक राज्यांना ई-रक्त कोष पोर्टलची अंमलबजावणी व्हावी, असे आधीपासूनच आदेश आहेत. राज्यातील रक्तपेढ्या तो पोर्टल वापरण्यास आणि त्यावर माहिती भरण्यास बांधील आहेत. पण, तसे करण्यास कुचराई केली जात असल्याचे सध्याच्या पोर्टलच्या परिस्थितीवरुन दिसून येते. नुकतीच राज्याच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांतर्फे रक्ताविषयीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत डॉ. अनुपकुमार यादव यांनी रक्तपेढ्यांना सुनावत पोर्टलवर माहिती अपलोड करावी यासाठी अल्टिमेटम दिलं आहे.

रक्तपेढ्यांनी पोर्टलवर ही माहिती दिली तर सामान्य रूग्णांना देखील याचा फायदा होऊ शकतो. हे पोट्रल वापरण्याबाबतची कोणतीही अडचण असल्यास राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे नोंद करावी. पोर्टल वापरतात की नाही यावर महिनाभर लक्ष ठेवलं जाईल. महिन्यानंतर हे पोर्टल न वापरल्याचे लक्षात आल्यास त्या रक्तपेढीचं एफडीएकडून लायसन्स रद्द करण्यात येईल, आरोग्य संचालनालयाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

फक्त ५० टक्के रक्तपेढ्या भरतात माहिती

आरोग्य संचालनालयाचे आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव यांनी रक्ताच्या समस्या आणि रक्तसाठा याविषयी वेबसाईटवर न अपडेट होणाऱ्या माहितीविषयी बैठक घेतली. या बैठकीत रक्तपेढ्यांद्वारा वेबसाईटवर दिल्या जाणाऱ्या रक्तसाठ्याविषयी माहिती मागवली होती. अहवालानुसार, फक्त ५० टक्के रक्त पेढ्या रक्तसाठ्याविषयी माहिती देत असल्याचं उघड झालं. या परिस्थितीला गांभिर्याने घेत मुंबईतील ६० रक्तपेढ्यांना नियमित वेबसाईट अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईत ९०० रक्तदात्यांची दररोज गरज भासते. तर, वर्षाला जवळपास ३ लाख युनिट रक्ताची गरज भासते.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -