घरमुंबईमुंबईकरांनो जंक फूडमुळे यकृतात वाढते चरबीचे प्रमाण

मुंबईकरांनो जंक फूडमुळे यकृतात वाढते चरबीचे प्रमाण

Subscribe

मुंबईतील झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलतर्फे एका सर्वेक्षणात नियमित तपासणीसाठी गेलेल्या ५६ व्यक्तींमध्ये चरबीयुक्त यकृत आढळून आलं आहे.

बदललेल्या जीवनशैलीमुळे खाण्याची पद्धतीही बदलल्या आहेत. यातून फॅट्सयुक्त खाणं, बैठं काम अशा अनेक वाईट गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. यातून आपल्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढत असल्याचं एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. मुंबईतील झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आणि नियमित तपासणीसाठी गेलेल्या ५६ व्यक्तींमध्ये चरबीयुक्त यकृत आढळून आलं आहे. त्यात रक्त तपासणी, पोटाची आणि श्रोणीभागाची अल्ट्रासाउंड चाचणीचा समावेश करण्यात आला होता. २७-७४ या वयोगटातील ३८२ पुरुष आणि १९८ महिलांचा समावेश होता. वर्षभर केलेल्या सर्वेक्षणानंतर डॉक्टरांना धक्कादायक निष्कर्ष मिळाले आहेत.

यकृतातील चरबी ठरतेय सायलंट किलर

यकृतातील अतिरिक्त चरबीला सायलेंट किलर म्हटले जात असून सध्याच्या काळात जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे तरुण वयातील व्यक्तींना हा चरबीयुक्त यकृताचा आजार जडत आहे. त्याच्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर हा आजार प्राणघातक ठरण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञ करत आहेत.

- Advertisement -

दोन प्रकारचे चरबीयुक्त यकृताचे आजार असतात. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (अल्कोहोलिक स्टिटोपेहटाटिस). त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. या आजाराचे निदान न केल्यास जीवावर बेतू शकते. कारण पुढे जाऊन ते तुमचे यकृत पूर्णपणे निकामी करू शकते (त्याला यकृताचा सिऱ्हॉसिस म्हणतात.) सिऱ्हॉसिसमध्ये चरबीयुक्त यकृतावर उपचार केलेले नसतात. त्यात यकृताच्या पेशी नष्ट झालेल्या असतात आणि यकृताला चट्टे पडतात आणि हे चट्टे बरे करता येत नाहीत. या रोगाची लक्षणे दिसून येत नाही.  – डॉ. रॉय पाटणकर, झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे संचालक


वाचा – आरोग्यदायी भाज्या

- Advertisement -

वाचा – लठ्ठपणा दूर करण्याचे १२ सोपे घरगुती उपाय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -