इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेला तुफान प्रतिसाद; हे आहेत विजेते

बक्षीस वितरण सोहळा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहे.

Mumbai
Eco friendly bappa contest
इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट - २०१९

लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. प्रबोधनाचा हा वारसा आजही घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारे भाविक जपत आहेत. पर्यावरणाचे संवर्धन व्हावे आणि सण साजरे करताना पर्यावरणाबद्दल अधिकाधिक प्रबोधन होण्यासाठी माय महानगरने ‘इको फ्रेंडली बाप्पा’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते. यावर्षी तब्बल १०९ भाविकांनी आपले अर्ज या स्पर्धेसाठी पाठवले होते. यापैकी तीन स्पर्धकांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

प्रथम विजेता
१९५६ मतं – सतीश पवार, मुंबई (लिंक)

द्वितीय विजेता
१२०१ मतं – पारुल पाटणकर, डोंबिवली (लिंक)

तृतीय विजेता
११९७ मतं – मिनल नेरकर, पुणे (लिंक)

इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा गणेश चतुर्थीच्या दिवशी (२ सप्टेंबर) सुरु झाली. १२ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला रात्री १२ वाजता मतदान बंद करण्यात आले. या दहा दिवसांत १०९ स्पर्धकांनी अर्ज केले होते. १२ तारखेला मतदान बंद झाल्यानंतर आमच्या टेक्निकल टीमने मतदान योग्य पद्धतीने झाले की नाही याची छाननी केली. तांत्रिक बाबी तपासून झाल्यानंतर आज आम्ही विजेत्यांची घोषणा करत आहोत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मायमहानगर वेगळ्या पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करते. यामध्ये स्पर्धकाची लिंक जनरेट करुन त्यावर व्होटिंगचा पर्याय दिला जातो. माय महानगरचे वाचक आणि स्पर्धकांचे आप्तस्वकीय त्यावर मतदान करतात. यानिमित्ताने जास्तीत जास्त लोकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्याची प्रेरणा मिळते.

बक्षीस वितरण सोहळा दिवाळीनंतर

इको फ्रेंडली बाप्पा सोबतच ‘आपलं महानगर’ या आमच्या दैनिकातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेश चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते. गणपती विसर्जनानंतर या स्पर्धेसाठी अर्ज येत असतात. दोन्हीही स्पर्धेचा निकाल एकत्र जाहीर केला जातो. (मागच्या वर्षीचा सोहळा पाहण्यासाठी क्लिक करा) मात्र यावर्षी निवडणुका असल्यामुळे बक्षीस वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी विधानसभेचा निकाल आहे, त्यानंतर दिवाळीची सुट्टी येत असल्याकारणाने बक्षीस वितरण सोहळा हा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील होईल, याची कृपया नोंद घ्यावी.