घरमनोरंजनइक्बाल मिर्ची प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीची नोटीस!

इक्बाल मिर्ची प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीची नोटीस!

Subscribe

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना ईडीने नोटीस बजावली आहे. इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावला आहे. राज यांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. राज कुंद्रा यांना ४ नोव्हेंबरला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. मात्र राज कुंद्रा यांनी आपल्यावर असलेले सगळे आरोप फेटाळले आहेत.

- Advertisement -

आरकेडब्ल्यू डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या तपशीलांची पडताळणी करत असतामा ईडीला राज कुंद्रा यांच्या संदर्भातली माहिती आढळली. कारण या पडताळमीत इसेन्शिअल हॉस्पिटॅलिटी लिमिटेड कंपनीचं नाव समोर आलं. ही कंपनी राज कुंद्रा यांच्या मालकिची आहे. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टी या कंपनीची संचालक आहे. दरम्यान २०११ मध्ये मी एक जमीन आणि कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हलपर्सना विकली होती. एअरपोर्टच्या जवळ असलेल्या या जमिनीचे सगळे कागद माझ्या सीएने तपासले आहेत. त्यानंतर या कंपनीशी माझा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण राज कुंद्रा यांनी दिलं.

- Advertisement -

बिंद्राच्या कंपनीने कुंद्रा यांच्या कंपनीत ४४.११ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तसेच शिल्पा व राज कुंद्रा यांच्या कंपनीला एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळात ३०.४५ कोटी रुपये तर एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या काळात ११७.१७ कोटी रुपयांचे कर्जही या कंपनीकडून मिळाले आहे. ईडी याप्रकरणी राज कुंद्रा यांची चौकशी करणार आहे.इक्बाल मिर्ची कनेक्शनवरून ईडीने याआधी माजी केंद्री मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचीही चौकशी केली आहे. मिर्ची कनेक्शन प्रकरणी रणजीतसिंग बिंद्रासह मिर्चीचा जवळचा साथीदार हारून युसुफ मनी लाँडरिंग प्रकरणी अटकेत असून दोघेही सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -