Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई ED ने प्रताप सरनाईक यांच्या टिटवाळ्यातील 112 जमिनींचा ताबा घेतला - किरीट...

ED ने प्रताप सरनाईक यांच्या टिटवाळ्यातील 112 जमिनींचा ताबा घेतला – किरीट सोमैया

Related Story

- Advertisement -

अंमलबजावणी संचलनालय (ED) ने शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या टिटवाळा येथील ११२ एकर जमिनीचा ताबा शनिवारी घेतला. ईडीने याआधीच या जमिनी संबंधीच्या जप्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार ED मार्फतची ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांनी NSEL घोटाळ्याचे ₹100  कोटी विहांग आस्था हौसिंग कंपनी LLP मधे वळविले होते. टिटवाळा येथील गुरवली गावात 112 जमिनी घेतल्या होत्या, असा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.

टिटवाळा येथील जागेबाबत 31 जानेवारी, 2014 रोजी ED ने या जमिनी संबंधी जप्तीचे आदेश दिले होते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत ट्रिब्यूनलनेही यासाठीची मान्यता दिली होती. आता या जमिनीचा प्रत्यक्ष ताबाही ED ने घेतला.  एकुण 78.27 एकर जमिनीचा ताबा काल ED ने घेतला. ED ने या जागेवर आपले बोर्डही लावले आहेत.

- Advertisement -

“PMLA कायद्यातर्गत या जमिनींचा कब्जा Directorate of Enforcement, Mumbai तर्फे घेण्यात आला आहे. Prevention of Money Laundering Act, 2002 च्या अंतर्गत या जमिनींचा ताबा अधिकृतरित्या घेण्यात आला आहे. या जमिनींवर अतिक्रमण ( Trespassing Prohibited) करण्यास बंदी आहे. या जमिनी संबंधी कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये बोर्ड ही ED अधिकारी यांच्या आदेशावरून लावण्यात आले आहे.

या जमिनींचे पाठच्या दारातून व्यवहार होत असल्याची तक्रार डॉ. किरीट सोमैया यांनी ED कड़े केली होती. याचा भाग म्हणून ED ने आता या तक्रारी संदर्भात कारवाई करताना ED नेच जागेचा ताबाच घेतला आहे असा दावा सोमय्या यांनी केला आहे. प्रताप सरनाईकचे भागीदार श्री. मोहित अग्रवाल यांनी NSEL चा 250 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता, त्यातले ₹100 कोटी, ह्या विहांग आस्था कंपनी मधे, अशा जमिनी/मिळकती घेण्यासाठी वापरले होते. त्यामुळे ही जप्तीची कारवाई झाली आहे असा आरोप किरीट सोमय्या यांनी आहे.

- Advertisement -