घरमुंबई...तर सिडको कार्यालयावर अंडी, टोमॅटो, चप्पल फेकणार

…तर सिडको कार्यालयावर अंडी, टोमॅटो, चप्पल फेकणार

Subscribe

शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि इतर संकुलांनी सामाजिक सेवा देण्याच्या नावाखाली सामान्य नागरिकांची सरसकट लूट चालवली असूनही त्याकडे सिडकोचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप युनाइटेड काँग्रेस पार्टीने केला आहे. त्यामुळे सोमवारपासून लापूर येथील सिडको भवनासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये पहिले दोन दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर तिसर्‍या दिवशी सिडको कार्यालयावर टोमॅटो आणि चौथ्या दिवशी अंडी फेकण्यात येणार आहेत. पाचव्या दिवशी चप्पल तर सहाव्या दिवशी चिखलफेक करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतरही सिडको प्रशासनाला जाग आली नाही, तर 30 जुलै रोजी मानवी साखळी करून सिडको कार्यालय बेलापूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढून शहर विकास मंत्र्यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे.

सिडकोने राज्यातील 100 पेक्षा जास्त संस्थांना अतिशय कमी किमतीमध्ये मोठमोठे भूखंड प्रदान केले. नवी मुंबईतील नागरिकांना चांगले, माफक दरात शिक्षण, आरोग्यसेवा, क्रीडा आणि इतर सामाजिक सेवा मिळाव्यात हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळे सिडकोने आपल्या करारनाम्यात या जमिनीचा वापर खासगी फायद्यासाठी केला जाणार नाही, अशी एक अट घालून ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर ही संकुले चालविण्यात येतील, ही व्यवस्था केली होती. असे असतानादेखील गेल्या काही वर्षांत असे दिसून आले आहे की सामाजिक सेवा देण्याच्या नावाखाली जे भूखंड नगण्य किमतीमध्ये घेण्यात आले, त्यावर स्थापन करण्यात आलेल्या संकुलांमध्ये सरसकट सामान्य नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. नवी मुंबईतील सर्व स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळ प्रशिक्षणाच्या नावाखाली या श्रीमंतांसाठी मनोरंजन केंद्र चालविली जात आहेत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -