घरमुंबईशवदाहिनीचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ

शवदाहिनीचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ

Subscribe

महापालिकेकडून २००८ मध्ये करावे गावात कोट्यवधी रुपये खर्च करून विद्युत शवदाहिनी आणली. नागरिकांची मागणी नसताना पालिकेने उभारलेले ही वीजदाहिनी वापर होत नसल्यामुळे पडून आहे. या शवदाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी काही महिन्यांपूर्वी कंत्राट काढले असता त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालिका या शवदाहिनीचे करणार काय? असा प्रश्न आहे.

महापालिकेकडून २००८ मध्ये करावे गावात कोट्यवधी रुपये खर्च करून विद्युत शवदाहिनी आणली. नागरिकांची मागणी नसताना पालिकेने उभारलेले ही वीजदाहिनी वापर होत नसल्यामुळे पडून आहे. या शवदाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी काही महिन्यांपूर्वी कंत्राट काढले असता त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालिका या शवदाहिनीचे करणार काय? असा प्रश्न आहे. पारंपरिक पद्धतीने शव दहन करताना होणारी वृक्षतोड आणि निर्माण होणारे प्रदुषण याला पर्याय म्हणून तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या निधीतून सन २००८ मध्ये शवदाहिनी आणली. मात्र, या शवदाहिनीच्या देखभालीसाठी कंत्राटदारच मिळत नसल्याने याच शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

तत्कालीन मनपा आयुक्त आणि आताचे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात स्मशानभूमी व्हिजन राबवण्यात आले होते. त्यावेळी मूळ स्मशानभूमीचा कायापालट करण्यात आला होता. सुरुवातीला अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. नंतर पालिकेने मोफत अंत्यविधी पद्धत सुरू केली. सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून विद्युत दाहिनीची सोय करण्यात आली. मात्र, तिचा वापरच झालेला नाही.

- Advertisement -

त्यातच या दाहिनीसाठी ७०० डिग्री तापमानाची गरज असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. तसेच दाहिनीचा वापर करण्यासाठी काही तास आधीच ती सुरू करून ठेवावी लागते, या सर्व अडचणी असल्यामुळे अद्याप शवदाहिनीचा वापर करण्यात आलेला नाही. पालिका ही शवदाहिनी सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सुरुवातीला नवी मुंबईतील एक सामाजिक संस्था ही दाहिनी चालवणार होती. मात्र, त्यानंतर ती पालिकेकडून चालवण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. या ठिकाणी विजेऐवजी गॅसचा वापर केला जाणार असल्याचे मनपाकडून जाहीर करण्यात आले असता लवकरात लवकर ही शवदाहिनी वापरली जाईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, तसे झाले नाही.

करावे येथील विद्युत शवदाहिनी सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून त्या ठिकाणी विजेऐवजी गॅसचा वापर केला जाणार आहे. याबाबत लवकरच आयुक्तांच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. पालिका ही शवदाहिनी सुरू करणार आहे.
-मोहन डगावकर, अतिरिक्त आयुक्त, नमुंमपा

- Advertisement -

करावे येथील विद्युत शवदाहिनीची एका चांगल्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याला नागरिकांचा योग्य प्रतिसाद मिळाला नाही. नागरिकांची अंत्यसंस्काराविषयीची मानसिकता बदलली तर ती शवदाहिनी सुरू करता येईल. गेली अनेक वर्षे शवदाहिनी बंद असूनही ती सुरू व्हावी यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही .
-विजय नाहटा, तत्कालीन मनपा आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -