TRP चा घोटाळा ३० हजार कोटींच्या वर; संजय राऊत यांची माहिती

Shiv Sena leader Sanjay Raut
संजय राऊत यांनाही सुनावले

“इलेक्ट्रॉनिक मीडियामधील सर्वात मोठा टीआरपीचा घोटाळा मुंबई पोलिसांनी उघड केला आहे. ज्याअर्थी मुंबई पोलीस आयुक्त स्वतः पत्रकार परिषदेत समोर येऊन माहिती देतायत याचा अर्थ त्यांच्याकडे भक्कम पुरावे आहेत. मुंबई पोलीस प्रोफेशनल आहेत, ते विनाकारण काही करणार नाहीत. काही दिवसांपासून खूप नाटक चाललं होतं. फक्त मीच चांगला आणि बाकी सगळे कसे वाईट आहेत, हे सांगण्याचा आटापिटा काही लोक करत होते. पण महाराष्ट्राच्या भूमीत खोटेपण फारकाळ टीकत नाही.”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत आंनी टीआरपी प्रकरणावर बोलताना दिली.