नरिमन पाँईट येथे कंपनीत अकरा लाखांचा अपहार

कंपनीच्या कर्मचार्‍याने अपहार केल्याचे तपासात उघड

Mumbai
Students robbed home to have fun in kankavali
विद्यार्थ्यांनी मौजमजेसाठी केली घरफोडी

मुंबई : नरिमन पाँईट येथील एका खाजगी कार्यालयातून सुमारे अकरा लाख रुपयांचा मुद्देमाल अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा मुद्देमाल कंपनीच्याच एका कर्मचार्‍याने पळविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी मरिनड्राईव्ह पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदविला आहे.

आरोपी कर्मचारी उत्तर प्रदेशला पळून गेला असून त्याचा शोध सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी सांगितले. मंदार शशिकांत सालकाडे हे ठाणे येथील घोडबंदर रोडवरील आझादनगर, न्यू ब्रम्हांड सहकारी सोसायटीमध्ये राहतात. त्यांच्या मालकीची शिमनित उच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी असून या कंपनीचे एक कार्यालय नरिमन पॉईट येथील जमनालाल बजाज मार्गावरील रिजन चेंबर्समध्ये आहे. याच कंपनीत आरोपी कामाला आहे. १८ मे ते १८ ऑक्टोंबर २०१८ या कालावधीत त्याने कंपनीतील आठ लॅपटॉप, पाच संगणक, वीस रॅम, अठरा प्रोसेसर, बारा ग्राफिक कार्ड असा अकरा लाख बारा हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल परस्पर अपहार केला होता. हा प्रकार अलीकडेच मंदार सालकाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या कर्मचार्‍याविरुद्ध अपहाराचा गुन्हा नोंदविला आहे. तो उत्तर प्रदेशला पळून गेल्याने लवकरच एक टिम तिथे पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.