घरमुंबईभिवंडीत स्लॅब कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडीत स्लॅब कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू

Subscribe

भिवंडी शहरातील पद्मानगर येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रुममधील स्लॅब प्लास्टर कोसळून अकरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

भिवंडी शहरातील पद्मानगर येथील दुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका रुममधील स्लॅब प्लास्टर कोसळून अकरा वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्लॅब कोसळला त्यावेळी घरात आईसोबत दोन मुली झोपलेल्या होत्या. दरम्यान, यात एका मुलीचा मृत्यू झाला असून आई आणि दुसरी मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.

आई-बहिण जखमी 

भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातील गणेश टॉकीजजवळील मार्कंडेय नगर येथील गंगाजमुना ही तीस वर्ष जुनी तळ अधिक दोन मजली अरुंद इमारत असून या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत उमेश एनगुंदला याची पत्नी स्नेहा आणि दोन मुली गेल्या दोन वर्षांपासून भाड्याने राहत होते. पती उमेश कामावर जाऊन आल्यावर रात्री उशीरापर्यंत आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत परिसरातच बसला असता घरात पत्नी स्नेहा मुलगी साक्षी (वय ११) आणि प्रगती (वय ८) यांच्यासोबत झोपली असता मध्यरात्री त्यांच्या खोलीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळले. त्यामधील प्लास्टरचा मोठा भाग साक्षी हिच्या डोक्यात व छातीवर पडल्याने या दुर्घटनेत साक्षीचा मृत्यू झाला. तर आई स्नेहा व बहीण प्रगती यांच्यावर कमी प्रमाणात प्लास्टर पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. साक्षी ही सहावी इयत्तेत शिकत होती. दुर्घटनेनंतर तातडीने साक्षीला स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

- Advertisement -

हेही वाचा –

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकराचे प्रेयसीवर धारदारशस्त्राने वार

‘आधी रस्ते नीट करा, मग एक लाख घ्या’; वाहतूक विभागाला नागरिकांचा संतप्त सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -