घरCORONA UPDATEडॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना आता सात दिवस काम, सात दिवस सुट्टी

डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना आता सात दिवस काम, सात दिवस सुट्टी

Subscribe

कोरोनाच्या काळात सेवा बजावणाऱ्यांना डॉक्टरांसह सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना चक्राकार पध्दतीने अर्थात रोटेशन पध्दतीने सुट्टी देण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे.

मागील दोन ते सव्वा दोन महिन्यांपासून कोरोना कोविड-१९ची सलग सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांसह इतर सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना सुट्टीचा लाभ न मिळाल्याने ते पूर्णपणे थकलेत. विश्रांतीअभावी त्यांच्या कामाचा मानसिक ताण निर्माण झालेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात सेवा बजावणाऱ्यांना डॉक्टरांसह सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना चक्राकार पध्दतीने अर्थात रोटेशन पध्दतीने सुट्टी देण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यामुळे कोरोना कोविड केंद्र तथा रुग्णालय आदी ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सात दिवस काम आणि सात दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या सात दिवसांच्या सुट्टीमध्ये त्यांना नॉन कोविडही ड्युटी न देता ही सुट्टी भर पगार देण्यात यावी, अशाप्रकारचे आदेश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिवांनी जारी केले आहे.

राज्यामध्ये कोविड -१९च्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचारी यांना चक्राकार पध्दतीने कामकाजु व ड्युटी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच कोविड केअर सेंटर आदींमध्ये काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या ड्युटी चक्राकार पध्दतीने लावण्यात याव्यात. ७ दिवस या संस्थांमध्ये काम केल्यानंतर ७ दिवस ड्युटी रजा देण्याबाबतच्या सूचना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

कोरोना केअर सेंटर व रुग्णालयांमध्ये ७ दिवसांची कोविड ड्युटी पुर्ण केल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांना ७ दिवस पुर्ण पगारी ड्युटी रजा देण्यात यावी. ७ दिवसाच्या ड्युटी रजा कालावधीमध्ये हे कर्मचारी व अधिकारी त्यांच्या घरी राहतील. या कालावधीमध्ये त्यांचे आयसोलेशन तथा क्वांरटाईन अपेक्षित नसल्याचे सांगितले. तसेच कोविड-१९ करता कंत्राटी पध्दतीने नेमलेल्या डॉक्टर्स तसेच कर्मचारी यांना ७ दिवस कोविड ड्युटी व ७ दिवस पुर्ण पगारी रजा देण्यात यावी. त्यांना नॉन कोविड ड्युटी देणे अपेक्षित नाही. परंतु ज्या रुग्णालयांमध्ये पुरेसे कंत्राटी कर्मचारी उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी नियमित कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार चक्राकार पध्दतीने ड्युटी लावण्यात यावी, असेही या पत्रकात म्हटले आहे.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -